Tuesday, May 6, 2025

शाळांमध्ये परिणामकारक व गुणवत्तापूर्ण शैक्षणिक उपक्रम राबवाअतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी यांचे स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींना आवाहन

 
नागपूर:-  महापालिकांच्या शाळांमध्ये स्वयंसेवी संस्थांतर्फे परिणामकारक व गुणवत्तापूर्ण उपक्रम राबवावेअसे आवाहन महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी यांनी केले. नागपूर महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिकसामाजिकसांस्कृतिक विकासासाठी शहरातील विविध स्वयंसेवी संस्थांतर्फे  (एनजीओ) उपक्रम राबविले जातात. अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी यांच्या अध्यक्षतेखाली एनजीओंच्या प्रतिनिधींची बैठक आज महापालिकेच्या मुख्यालयात पार पडली यावेळी शिक्षणाधिकारी श्रीमती साधना सयामआकांशा शाळेचे नोडल अधिकारी श्री. विनय बगळे तसेच एनजीओ चे प्रतिनिधी उपस्थित होते. यात पियूष वानखेडे व जीवन मेहेर (एचसीएल फाऊंडेशन)श्रीमती शर्मिष्ठा गांधी (आरोह)रामकुमार सोनुले श्रीमती प्रिया बेलसरे  (होंडा की पाठशाला)श्रीमती स्नेहल कोट्टे (उदय एनजीओ)श्री. प्रणय देशभ्रतारश्रीमती श्रद्धा चिखलकर (मेलजिओ)श्री. मोहन पांडे (मासूम)श्रीमती पौर्णिमा ढवळे (प्रथम एज्युकेशन)श्रीमती शबाना अंसारीश्री. आशीष शर्मा (आकांक्षा फाऊंडेशन)नितेश नागदेवे (सह्याद्री फाऊंडेशन) प्रतिनिधी उपस्थित होते.स्वयंसेवी संस्थांतर्फे महापालिकेच्या शाळांमध्ये राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती 
एनजीओंच्या प्रतिनिधींकडून अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी. यांनी समजून घेतली. पर्यावरणसंगणक साक्षरताझोपडपट्टीतील मुलांचा विकासआरोग्यरस्त्यावर फिरणारे मुले१० वीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहकार्य करणेबालवाडीमध्ये राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती एनजीओच्या प्रतिनिधींनी यावेळी दिली. एनजीओंनी त्यांच्या शाळांमधील शिक्षणवृद्धीसाठी चालविल्या जात असलेल्या उपक्रमाची माहिती दिली. तसेच आकांक्षा फाऊंडेशनने माझी शाळासक्षम शाळा या शाळा रुपांतरण प्रकल्पाबाबतचे सादरीकरण केले. शाळा रुपांतरणासंदर्भात सर्वसमावेशक अभ्यास व प्रकल्पाची प्रक्रिया मूल्यमापन आयडी इनसाईट या संस्थेच्या प्रतिनिधींनी सादर केले. यावेळी बोलताना अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी. यांनी शाळांमध्ये सुरू असलेल्या उपक्रमांचा परिणाम दिसून आला पाहिजेयावर भर दिला. एनजीओतर्फे चालविण्यात येत असलेल्या उपक्रमाचे परिणाम दृश्यमान असले पाहिजे. या उपक्रमांना यापुढे बळकट व परिणामकारक कसे करता येईलयावर विचार होण्याची आवश्यकता आहे. हे उपक्रम राबविण्यासाठी एनजीओंना येत असलेल्या अडचणी समजून घेण्याची तसेच या अडचणी दूर करण्यासाठी महापालिकेतर्फे मदत देण्याचे आश्वासनही श्रीमती वैष्णवी बी. यांनी यावेळी दिले. 

No comments:

Post a Comment

अंबाझरी, फुटाळा व गोरेवाडा तलावांवर सुरक्षेच्या उपाययोजना नागरिकांनी सुरक्षेच्या सूचनांचे पालन करावे

नागपूर - शहरातील अंबाझरी ,  फुटाळा व गोरेवाडा तलाव ओव्हर फ्लो होण्याची शक्यता लक्षात    घेऊन नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने तसेच...