Tuesday, May 6, 2025

राज्य स्तरीय पदक प्राप्त दिव्यांग खेळाडूंनाही दीड लाख रुपयांची मदत

नागपूर:-नागपूर महापालिकेच्यावतीने दिव्यांग क्रीडा प्रोत्साहन योजनेतअंतर्गत क्रीडा विभागातर्फे आता राज्य स्तरीय खेळाडूंना सुद्धा क्रीडा साहित्य खरेदीसाठी दीड लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात या योजनेची संकल्पना क्रीडा विभागामार्फत राबविण्यात येत आहे.मंगळवारी (ता. 6) महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेतील बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आयुक्त सभाकक्षात आयोजित बैठकीत अति. आयुक्त श्रीमती वैष्णवी बी., उपायुक्त डॉ. रंजना लाडे, उपायुक्त श्री. विनोद जाधव, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. 
दिपक सेलोकर, शिक्षाधिकारी श्रीमती साधना सयाम, क्रीडा अधिकारी डॉ. पियुष आंबुलकर, समग्र शिक्षण विभागाचे जिल्हा समन्वयक श्री. अभिजीत राऊत, महात्मा गांधी सेवासंघाचे श्री. विजय कान्हेकर उपस्थितीत होते.राज्यराष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये खेळणाऱ्या दिव्यांग खेळाडूंना प्रोत्साहन व आर्थिक मदत देण्यासाठी महापालिकेतर्फे आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय घेतला आहे. यात यापुढे राज्य स्तरावरील स्पर्धांमध्ये पदक प्राप्त करणाऱ्या खेळाडूंना सुद्धा 1 लाख 50 हजार  रुपयांचे क्रीडा साहित्ये दिले जाणार आहे. या निर्णयाचा शहरातील दिव्यांग खेळाडूंना लाभ मिळणार आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तवरील स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या दिव्यांग खेळाडूंना 3 लाख रुपयांची मदत पूर्ववत सुरू राहणार आहे.

No comments:

Post a Comment

अंबाझरी, फुटाळा व गोरेवाडा तलावांवर सुरक्षेच्या उपाययोजना नागरिकांनी सुरक्षेच्या सूचनांचे पालन करावे

नागपूर - शहरातील अंबाझरी ,  फुटाळा व गोरेवाडा तलाव ओव्हर फ्लो होण्याची शक्यता लक्षात    घेऊन नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने तसेच...