Saturday, October 26, 2024

नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने दान केल्या घरातील निरुपयोगी वस्तू -निरुपयोगी वस्तू संकलन/दान केंद्राचे आयुक्त डॉ. चौधरींच्या हस्ते उद्घाटन

 नागपूर:- नागपूर महानगरपालिकेद्वारा स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी अभियानांतर्गत दिवाळीतील निरुपयोगी वस्तू संकलन केंद्र शहरातील विविध ठिकाणी उभारण्यात आले, यातील मंगळवारी झोन येथील राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय परिसरातील निरुपयोगी वस्तू संकलन केंद्राचे उद्घाटन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते शनिवारी (ता: २६) करण्यात आले. तसेच मनपाच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी धंतोली उद्यान परिसरात उभारण्यात आलेल्या केंद्राला भेट देत नागरिकांशी संवाद साधला. उद्घाटन प्रसंगी मनपाचे उपायुक्त श्री. विजय देशमुख, उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले यांच्यासह मनपाचे अधिकारी व कर्मचारी केंद्रावर उपस्थित होते.मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल व श्री. अजय चारठाणकर यांच्या मार्गदर्शनात दिवाळीतील निरुपयोगी वस्तू संकलन मोहीम सुरु करण्यात आली असून, आयुक्तांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने मनपाच्या केंद्रांवर घरातील निरुपयोगी वस्तू दान केल्या. शनिवार सकाळपासून नागरिकांनी केंद्रंकडे धाव घेत घरातील घरातील पुनर्वापरण्यात येणाऱ्या किंवा निरुपयोगी वस्तु/साहित्य जसे कपडे, लाकडी वा प्लास्टिकच्या वस्तू, घरातील भांडी, खुर्च्या, खेळणी, कपाट, चपला /जोडे, पुस्तकांची रद्दी, इलेक्ट्रॉनिक वस्तू या संकलन केंद्रामध्ये जमा केल्या. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी आणि अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी स्वतः विविध 


केंद्रांवर भेट देत नागरिकांचा उत्साह वाढविला. मनपाच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील घरातील निरुपयोगी वस्तू दान करीत अभियानात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.दिवाळीनिमित्त स्वच्छते दरम्यान घरातून निघणाऱ्या वस्तूंचे संकलन करून त्याचा पुनर्वापर करण्याचा महत्त्वाचा निर्णय नागपूर महानगरपालिकेने स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळी अभियानंतर्गत घेतला आहे. घरातून निघणाऱ्या वापरात नसणाऱ्या वस्तूंचा स्वीकार करण्यासाठी मनपाने दहाही झोन निहाय निरुपयोगी वस्तू संकलन/स्वीकार केंद्रे उभारण्यात आले असून, पहिल्या दिवशी नागरिकांनी मोहिमेला उदंड प्रतिसाद दर्शविला, ही केंद्रे सोमवार  28 ऑक्टोबर सकाळी ८ ते दुपारी ४  पर्यंत नागरिकांच्या  सेवेत राहणार आहेत. तरी नागरिकांनी आपल्या घरातील पुनर्वापरण्यात येणाऱ्या किंवा निरुपयोगी वस्तु/साहित्य/ इलेक्ट्रॉनिक वस्तू संकलन केंद्रामध्ये जमा करून गरज वंताना लाभ देण्यास सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त डॉ. चौधरी यांनी केले आहे.संपूर्ण शहरात मनपाद्वारे प्रभाग स्तरावर उभारण्यात आलेल्या निरुपयोगी वस्तू दान/संकलन  केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्रांवर नागरिकांनी आपल्या घरातील निरुपयोगी वस्तू स्वतंत्र वर्गीकरण करून केंद्रावर जमा केल्या. वर्गीकृत स्वरूपात जमा करून अभियानात उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शविणाऱ्या नागरिकांना नागपूर महानगरपालिकेद्वारे थँक यूचे स्टिकर्स देण्यात आले. आपल्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त होत असल्याचे बघून नागरिक भारावून केले.

आयकरविषयक बाबींमध्ये आयकर अधिकाऱ्यांनी आदेश तसेच नोटीस देताना भाषेकडे लक्ष देण अत्यावश्यक

नागपुर:- सामान्य नागरिकांच्या  जीवनामध्ये बदल घडवून आणणाऱ्या करविषयक बाबींमध्ये आयकर अधिकाऱ्यांनी आदेश तसेच नोटीस देताना भाषेकडे लक्ष देण अत्यावश्यक आहे असे  प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांनी आज नागपूर मध्ये केले. आयकर अधिकारी पदावरून नव्याने पदोन्नती मिळालेल्या सहाय्यक आयुक्तांच्या 'उत्तरायण -2024' या प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप आज त्यांच्या उपस्थितीत नागपूरच्या राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकॅडमी -एनएडीटी येथे पार पडला त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी एनएडीटीचे प्रशिक्षण महासंचालक पी. सेल्वा गणेश,अतिरिक्त महासंचालक मुनीष कुमार ,उत्तरायण 2024 चे प्रशिक्षण संचालक एस.एम.व्ही.व्ही. शर्मा  तसेच या अभ्यासक्रमाचे प्रभारी अतिरिक्त महासंचालक आकाश देवांगन प्रामुख्याने उपस्थित होते.अधिकाऱ्यांनी 
आपल्या कारकिर्दीमध्ये एकनिष्ठता अभ्यासपूर्ण दृष्टिकोन कायम ठेवावा असे सिरपूरकर सांगितले .आयकर आदेशातील सर्व तथ्यांचा अभ्यास करून त्या पुन्हा पुन्हा तपासल्या पाहिजे असेही आवाहन त्यांनी आयकर अधिकाऱ्यांना केलं याप्रसंगी उत्तरायण 2024 या प्रशिक्षण कार्यक्रमाचे प्रशिक्षण संचालक एस . एम. व्ही .व्ही शर्मा यांनी  तुकडीचा अहवाल मांडतांना सांगितले कीगत सप्टेंबर महिन्याच्या 9 तारखेपासून सुरु झालेल्या या 7 आठवड्यांच्या  प्रशिक्षण कार्यक्रमात 150 नव्याने पदोन्नत झालेल्या सहाय्यक आयकर आयुक्त अधिकारी प्रशिक्षणार्थींचा समावेश होता. यात 20 महिला अधिकाऱ्यांचा देखील समावेश   असून सर्वात जास्त अधिकारी हे बिहार राज्यातील आहेत .या तुकडीचे सरासरी सेवा वय हे 28 वर्ष असून या तुकडीतील सर्वात तरुण अधिकारी हे 45 वर्षाचे तर सर्वात ज्येष्ठ 
अधिकारी हे 59 वर्षाचे  आहेत .याप्रसंगी काही प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी या प्रशिक्षणासंदर्भात आपले अनुभव कथन केले .प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना प्रमाणपत्राचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तर सीमा भारती आणि ऐला श्रीनिवास यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रधान महासंचालकांचे सुवर्णपदक प्रदान करण्यात आले .उत्तरायण 2024 च्या अधिकाऱ्यांनी एनएडीटीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमा भेट स्वरूपात दिल्या आहेत.  या प्रतिमांचं  अनावरण सुद्धा शिरपूरकर यांच्या हस्ते झालं.  अतिरिक्त महासंचालक मनीष कुमार यांनी कर्तव्यनिष्ठतेची शपथ अधिकाऱ्यांना दिली . या कार्यक्रमाला आयकर विभागाचे अधिकारी उपस्थित होते .
 

ज्येष्ठ नागरिकांनी “राष्ट्रासाठी एक तास” द्यावा; अतिरिक्त आयुक्त श्री. अजय चारठाणकर -स्वीप अंतर्गत मनपात ज्येष्ठ नागरिक संघटनांची बैठक


नागपूर:- विधानसभा निवडणुकीसाठी मतदारांच्या मनात आपल्या राष्ट्रीय कर्तव्याप्रती जागृती निर्माण व्हावी याकरिता ज्येष्ठ नागरिकांनी राष्ट्रासाठी एक तास देत, मतदारांचे प्रबोधन व मार्गदर्शन करण्याच्या राष्ट्रीय कार्यात योगदान द्यावे असे आवाहन नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त तथा स्वीपचे नोडल अधिकारी श्री. अजय चारठाणकर यांनी केले.सिस्टिमेटिक व्होटर्स एज्यूकेशन अँड इलेक्ट्रॉल पार्टीसिपेशन अर्थात स्वीपकार्यक्रमांतर्गत नागपूर महानगरपालिकाद्वारे शहरातील विविध ज्येष्ठ नागरिक संस्था संघटनाच्या प्रतिनिधींची व शहरातील हॉकर्स असोसिएशनच्या प्रतिनिधींची शुक्रवारी (ता: २५) मनपाचे अतिरिक्त आयुक्त तथा स्वीपचे नोडल अधिकारी श्री. अजय चारठाणकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात आयोजित बैठकीत 
मनपाच्या उपायुक्त  डॉ. रंजना लाडे, स.वि.प्र. चे सहायक अधीक्षक राजकुमार मेश्राम यांच्यासह ज्येष्ठ नागरिक संघटनाचे प्रतिनिधी व हॉकर्स असोसिएशनचे प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी मार्गदर्शन करीत 
मनपाचे अतिरिक्त आयुक्त तथा स्वीपचे नोडल अधिकारी श्री. अजय चारठाणकर यांनी सांगितले की, लोकशाहीचा उत्सव असणाऱ्या निवडणूकांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची महत्त्वाची भूमिका आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत नागपूर शहरातील मतदानाचा टक्का वाढावा व जास्तीत जास्त नागरिकांनी मतदानासाठी बाहेर पडावे या करिता मतदारांचे प्रबोधन करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी पुढकार घ्यावा, मनपाद्वारे स्वीप अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमात सक्रीय सहभाग नोंदवावा. बीएलओ यांच्यावर अवलंबून न राहता, ऐन मतदानाच्या दिवशी धावपळ टाळण्यासाठी आणि आपले मतदान केंद्र तपासण्यासाठी Voter Helpline App चा वापर करावा आणि याबाबत इतरांना देखील मार्गदर्शन करावे, घरातील ज्येष्ठांनी प्रबोधनात्मक आवाहन केल्याचा मुलांवर नक्कीच सकारत्मक परिमाण होईल


असा विश्वास श्री. चारठाणकर यांनी व्यक्त केला.तसेच ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्या स्तरावर प्रभात फेरी, उद्यानांमध्ये युवकांचे मार्गदर्शन, विरंगुळा केंद्रावर मार्गदर्शन, भजन मंडळांनामार्फत मतदान जागृती करावी याकरिता मनपाचे संपूर्ण सहकार्य मिळेल असे आवाहन श्री, चारठाणकर यांनी केले. हॉकर्स असोसिएशने देखील आपल्याकडील आस्थापनांवर मतदान जनजागृती फलक लावावे असे आवाहन ही श्री. चारठाणकर यांनी केले.स्वीपकार्यक्रमांतर्गत नागपूर महानगरपालिकेद्वारा शहरातील विविध ठिकाणी मतदान जनजागृती फलक लावण्यात येत आहेत. यातील सेल्फी पाॅईट  वर ज्येष्ठ नागरिकांनी आपला सेल्फी घेत तो स्टेट्स वर ठेवावा व इतरांना देखील प्रोत्साहित करावे असे आवाहन  श्री. चारठाणकर यांनी केले आहे.

Wednesday, October 23, 2024

मतदार जनजागृतीवर भर देणारे विविध उपक्रम राबवावे: आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी- विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने आयुक्तांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा

नागपूर:- निवडणूक हा लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव असूनयात प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा अधिकार आहे. मतदान हे प्रत्येकाचे कर्तव्य देखील आहेयाची जाणीव करून देणारे आणि मतदार जनजागृती वर भर देणारे विविध उपक्रम नागपूर महानगरपालिका मुख्यालय व मनपाच्या दहाही झोन झोन निहाय राबबावे अशा सूचना मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी बुधवारी (ता: २३) दिल्या.  महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४च्या अनुषंगाने सिस्टिमेटिक व्होटर्स एज्यूकेशन अँड इलेक्ट्रॉल पार्टीसिपेशन अर्थात ‘स्वीप’ कार्यक्रमांतर्गत मनपाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाच्या पूर्वतयारी बाबतचा आढावा मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी घेतला. मनपा मुख्यालयातील आयुक्त सभा कक्षात आयोजित बैठकीत मनपाचे अतिरिक्त आयुक्त तथा स्वीपचे नोडल अधिकारी श्री. अजय चारठाणकरउपायुक्त डॉ. रंजना लाडेउपायुक्त श्री. प्रकाश वराडेडॉ. गजेंद्र महल्लेश्री. गणेश राठोडसहायक आयुक्त श्री. प्रमोद वानखेडेश्री.विजय थूलश्री. नरेंद्र बावनकरश्री. हरीश राऊतवैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकरशिक्षणाधिकारी श्रीमती साधना सयामक्रीडा अधिकारी डॉ. पियुष आंबुलकरअधीक्षक अभियंता डॉ. 
श्वेता बॅनर्जीनगर रचना उपसंचालक डॉ. ऋतुराज जाधव यांच्यासह मनपाचे अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी यांनी सर्व अधिकाऱ्यांनी समन्वयाने करावेमनपाच्या दहाही झोन निहाय मतदार जागृतीसाठी स्वीप अंतर्गत विविध उपक्रमांचे योग्य नियोजन करावेनियोजनाचे वेळापत्रक तयार करून घ्यावेलोकसभा निवडणुकीच्या वेळी ज्या मतदार संघात कमी प्रमाणात मतदान झाले असेल अशा ठिकाणी मतदानाची टक्केवारी वाढावी याकरिता नागरिकांना जागृत करण्यासाठी विविध उपक्रम राबवावेशहरातील दर्शनीय भागात  मतदान जागृती फलक लावावेतयुवकांचा सहभाग वाढविण्यासाठी फ्लॅश मॉब व पथनाट्यविविध स्पर्धा आयोजित कराव्यातमॉलरुग्णालयबाजारपेठेतमहाविद्यालयात विविध जनजागृती उपक्रम राबवावेतशहराच्या विविध भागात मतदानांचा उत्सावात साजरा करण्यासाठी बाईक रॅलीप्रभात फेरी काढण्यात  याव्या सर्व विधानसभा मतदार संघात अधिकाधिक मतदान करण्यासाठी नागरिकांना आवाहन करावेहॉटेलसोसायटीउंच इमारतीमध्ये नागरिकांना मतदान करण्याचे निवेदन करावेमहाविद्यालयशाळा आदी ठिकाणी नागरिकांकडून मतदान संकल्पपत्र भरून घ्यावेनागरिकांना मतदान करण्यासाठी मनपाच्या कचरा संकलन वाहनांवरून ध्वनीचित्रफित वाजवीत आवाहन करावेआदी सूचना  मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिल्या.बैठकीच्या सुरुवातीला अतिरिक्त आयुक्त तथा स्वीपचे नोडल अधिकारी श्री. अजय चारठाणकर यांनी मतदारांचे पद्धतशीर शिक्षण आणि निवडणूक सहभाग स्वीप कर्यक्रम नागपूर शहरीभागात यशस्वीरीत्या राबविण्याबाबत ची माहिती दिली.
 

सामाजिक संस्थाएं कर रही उच्च शिक्षित युवक-युवतियों के लिए 8 दिसंबर को परिचय सम्मेलन...

नागपुर:- पूज्य समाधा आश्रम में ब्रम्हलीन परम पूज्यनीय सतगुरू स्वामी शिवभजन महाराजी के आशीर्वाद से तथा परम पूज्यनीय सतगुरू बाबा नारायण भजन साहब के मार्गदर्शन में गत 25 सालों से सामाजिक बहुत सी सेवाएँ होती आ रही हैं,जिसमें मैरिज ब्युरो की सेवा भी है। मैरिज ब्युरो आफिस हर रोज सुबह 11 से 1 बजे तक और शाम 7.30 से 9.00 बजे तक खुली रहती है। इसमें समाज द्वारा अच्छा योगदान दिया जाता है और सफलतार्थ इन परिचय सम्मेलन में आये युवक युवतियों के 40 से 50 प्रतिशत रिश्ते जुड़ें हैं। बीते 22 वर्षों से समाधा आश्रम मेरिज ब्युरो व सिंधी सोशल फोरम नागपूर द्वारा संयुक्त रूप से सिंधी उच्च शिक्षित युवक युवतियों के लिए परिचय सम्मेलन अंतरराष्ट्रीय स्तर पर आयोजित किया जाता है। इसी श्रृंखला में 8 दिसंबर 2024 को जगत सेलिब्रेशन हाल में सुबह 8 बजे से शाम 5 बजे तक परिचय सम्मेलन का आयोजन किया गया है। सिंधी समाज के सभी वर्गों से विनंती की जाती है कि वो अपने विवाह लायक उच्च शिक्षित युवक युवतियों का पंजीकरण करने हेतु समाधा आश्रम मॅरिज ब्युरो, बैंक कालोनी, सिंधी सोशल फोरम, दयानंद नगर, नागपूर, शंकरलाल रंगलानी, दिलीप सावलानी, प्रकाश चेतवानी, मोहन मंजानी, अशोक माखीजानी से संपर्क कर सकते है।

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 85 प्रकरणांची नोंद उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर:- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 51 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. बुधवार (23) रोजी शोध पथकाने 85प्रकरणांची नोंद करून 66,300/- रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 18 प्रकरणांची नोंद करून  7,200/- रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत 5 प्रकरणांची नोंद करून 500/- रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 10 प्रकरणांची नोंद करून 4,000/- रुपयांची 
वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 24 प्रकरणांची नोंद करून 41,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. वर्कशाप, गॅरेजेस व इतर दुरुस्तीचे व्यवसायीकांने रस्ता, फुटपाथ मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 1,000रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 18 प्रकरणांची नोंद करून 3,600/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 9 प्रकरणांची नोंद करून 9,000/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.  तसेच उपद्रव शोध पथकाने धरमपेठ झोन अंतर्गत मे. बनब्रास कन्‍स्ट्रक्शन हल्दीराम यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकल्याबद्दल रू. 15,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला.  तसेच मे. आर आर असोसिएट यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकल्याबद्दल रू. 10,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. हनुमान नगर झोन अंतर्गत मे. एलिजंट इन्फ्रा यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकल्याबद्दल रू. 10,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. धंतोली झोन अंतर्गत मे. उदापुरे ज्वेलर्स यांनी मनपा विरूध्द विनापरवानगीशिवाय जाहिरातीचे बॅनर लावल्याप्रकरणी रु. 10,000/- चे दंड वसुल करण्यात आला. 

तसेच मे. मयुरेशवर रेसिडेन्सी यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकल्याबद्दल रू. 10,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. गांधीबाग झोन अंतर्गत मे. जयमहालक्ष्मी स्वीट्स यांनी प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. ५,०००/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे. यादव सेल्स यांनी प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. ५,०००/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. लकडगंज झोन अंतर्गत मे. महादेव बेकरी सेल्स यांनी प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. ५,०००/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. मंगळवारी झोन अंतर्गत मे. ड्रीम होम यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकल्याबद्दल रू. 10,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला.  उपद्रव शोध पथकाने प्रकरणांची नोंद करून रू. 80,000/- दंड वसूल केला.

Tuesday, October 22, 2024

दिवाळीत घरातील अनुपयोगी वस्तु संकलनासाठी मनपाची १५० केंद्रे

नागपूर :- दिवाळीनिमित्त घरोघरी स्वच्छता केली जाते. आपले शहर हे देखील आपले घरच आहे. स्वच्छते दरम्यान घरातून निघणाऱ्या अनुपयोगी वस्तूंचे संकलन करून त्याचा पुनर्वापर करण्याचा महत्त्वाचा निर्णय नागपूर महानगरपालिकेने स्वच्छ दिवाळीशुभ दिवाळी अभियानंतर्गत घेतला आहे. घरातून निघणाऱ्या वापरात नसणाऱ्या अनुपयोगी वस्तूंचा स्वीकार करण्यासाठी मनपाने दहाही झोन निहाय १५० अनुपयोगी वस्तु संकलन/स्वीकार केंद्रे उभारण्याचा निर्णय घेतला असूनयेत्या २६ ते २८ ऑक्टोबर या कालावधीत नागरिकांनी आपल्या जवळच्या केंद्रावर वर्गीकृत स्वरूपातील अनुपयोगी वस्तु आणून द्यावा व आपल्या शहराला स्वच्छसुंदर व पर्यावरणपूरक साकरण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी’ अभियान संदर्भात मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील आयुक्त सभा कक्षामध्ये मंगळवारी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी विविध माध्यमांशी संवाद साधला. याप्रसंगी मनपाच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयलघनकचरा व्यवस्थापन संचालक तथा उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले प्रामुख्याने उपस्थित होते.स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी’ अभियानाबद्दल माहिती देत आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले कीकेंद्र शासनाच्या 'स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळीया मोहिमे अंतर्गत नागपूर महानगरपालिकेद्वारे २१ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. अभियानांतर्गत येत्या शनिवार २६ ते सोमवार २८ ऑक्टोबर या कालावधीमध्ये मनपाच्या सर्व आरआरआर सेंटरसह प्रभागनिहाय तयार करण्यात आलेल्या १५० अनुपयोगी वस्तु संकलन/स्वीकार केंद्रांवर दिवाळीतील सफाई मध्ये निघणारा पुनर्वापरयोग्य तसेच अन्य अनुपयोगी वस्तु संकलीत केला जाणार आहे. तरी नागरिकांनी आपल्या घरातील पुनर्वापरण्यात येणाऱ्या किंवा निरुपयोगी वस्तु/साहित्य 
जसे कपडेलाकडी वा प्लास्टिकच्या वस्तूघरातील भांडीखुर्च्याखेळणीकपाटचपला /जोडेपुस्तकांची रद्दीइलेक्ट्रॉनिक वस्तू या संकलन केंद्रामध्ये जमा करून गरजुवंताना लाभ देण्यास सहकार्य करावेअसे आवाहनही आयुक्त डॉ. चौधरी यांनी केले.वर्गीकृत स्वरूपात अनुपयोगी वस्तु स्वीकार केंद्रावर जमा करून अभियानात उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शविणाऱ्याच्या नागरिकांचे घरसोसायटीच्या दारावर नागपूर महानगरपालिकेद्वारे थँक यू’ चे  स्टिकर्स लावण्यात येणार आहेत. हे विशेष'स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळीमोहिमे अंतर्गत २१ ते २४ ऑक्टोबर दरम्यान दररोज दहाही झोनमधील वेगवेगळ्या प्रभागांमध्ये 'स्वच्छ दिवाळी सखोल स्वच्छताउपक्रम राबविण्यात येणार आहे. २५ ऑक्टोबर रोजी दहाही झोनमधील १९ दहनघाटांची स्वच्छता अभियान राबविण्यात येईल. २९ आणि ३० ऑक्टोबर रोजी 'हर घर स्वच्छता के साथ दिवालीया थीमसह घरोघरी दिव्यांची सजावट तसेच स्वच्छता संदेश देणारी रांगोळी काढण्यात येईल. या उपक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात शहरातील जनतेचा सहभाग असणार आहे. २५ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीमध्ये मनपाच्या आयईसी चमूद्वारे बाजारपेठ आणि व्यापारी संकुलाच्या परिसरात 'व्होकल फॉर लोकलआणि पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याबाबत जनजागृती करण्यात येणार आहेअसेही डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले.आपल्या शहराला स्वच्छसुंदर व स्वस्थ साकारण्यासाठी नेहमी तत्पर राहणार्या सफाई कर्मचार्यांचा सत्कार मनपाद्वारे केला जाणार आहे. येत्या २७ ऑक्टोबर रोजी शहरातील घराघरातून कचरा संकलीत करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार असूनसोमवार २८ ऑक्टोबर रोजी शहरातील महापुरूषस्वातंत्र्य सेनानींच्या एकूण ५९ पुतळ्यांची व चौकांची स्वच्छता करण्यात येणार आहे.स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी अभिनांतर्गत नागपूर शहरातील विविध मैदानांची स्वच्छता येत्या ४ ते ७ नोव्हेंबर दरम्यान करण्यात येणार आहे. शहरातील मैदाने स्व्च्छ व्हावी याकरिता या उपक्रम हाती घेण्यात आला असूननागरिकांनी देखील मोठ्या संख्येत उपक्रमात सहभागी होत घराप्रमाणे शहराला देखील स्व्चछसुंदर साकारण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी अभियान अंतर्गत  मनपाच्या विविध उपक्रमामध्ये नागरिकनागरिक मंडळ/ समुहअशासकीय संस्था (एनजीओ)स्वयं सहायता समूह (SHG), शाळांचे विद्यार्थीयुथ ग्रुप यांना सहभागी करून घेण्यात येणार आहे.

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 106 प्रकरणांची नोंद उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर:-महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 51 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. मंगळवार (22) रोजी शोध पथकाने 106 प्रकरणांची नोंद करून 76,900/- रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 35 प्रकरणांची नोंद करून  14,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत 6 प्रकरणांची नोंद करून 600/- रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 6 प्रकरणांची नोंद करून 2,400/- रुपयांची वसुली करण्यात आली. मॉलउपहारगृहेलॉजिंगबोर्डींग हॉटेलसिनेमा हॉलमंगल कार्यालयकॅटरर्स सर्व्हीस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 2,000 रुपयांची वसुली 
करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 17 प्रकरणांची नोंद करून 38,500/- रुपयांची वसुली करण्यात आली. चिकन सेंटर, मटन विक्रेता, यांनी त्याचा कचरा रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 1,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. सार्वजनिक रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा इत्यादी ठिकाणी बांधकामाचा मलबा/टाकावू कचरा टाकणे/ साठवणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 1000 रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 27 प्रकरणांची नोंद करून 5,400/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 12 प्रकरणांची नोंद करून 12,000/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मीनगर झोन अंतर्गत मे. श्री राम अपार्टमेंट यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकल्याबद्दल रू. 10,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला.  तसेच मे. शावत इन्फ्रा यांनी सी अँड डी कचरा टाकल्याबद्दल रु. 5,000/- रुपयाचा दंड वसुल करण्यात आला. धरमपेठ झोन अंतर्गत मे. श्रीनिवासन होम मेकर यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकल्याबद्दल रू. 10,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला.  तसेच श्री. राजेश अग्रवाल, यांनी सी अँड डी कचरा टाकल्याबद्दल रु. 20,000/- रुपयाचा दंड वसुल करण्यात आला. 
तसेच मे. कॅफे कॉफी डे यांनी रेस्टॉरंटचा कचरा जवळच्या फूटपाथ परिसरात टाकला जात असल्याने मनपा नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल रू. 5,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. हनुमान नगर झोन अंतर्गत मे. सतगुरू कनस्ट्रक्रशनस यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकल्याबद्दल रू. 10,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. गांधीबाग झोन अंतर्गत मे. वर्मा स्वीट्स यांनी प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. ५,०००/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे. महादेव किराणा शॉप यांनी प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. ५,०००/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. मंगळवारी झोन अंतर्गत मे. हिमकश पार्क यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकल्याबद्दल रू. 10,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला.  तसेच मे. साई श्रध्दा डेव्हल्पर्स अँड प्रमोटर्स  यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकल्याबद्दल रू. 10,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. उपद्रव शोध पथकाने 10 प्रकरणांची नोंद करून रू. 90,000/- दंड वसूल केला.

नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने दान केल्या घरातील निरुपयोगी वस्तू -निरुपयोगी वस्तू संकलन/दान केंद्राचे आयुक्त डॉ. चौधरींच्या हस्ते उद्घाटन

  नागपूर : - नागपूर महानगरपालिकेद्वारा स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी अभियानांतर्गत दिवाळीतील निरुपयोगी वस्तू संकलन केंद्र शहरातील विविध ठिकाणी उभ...