नागपूर:- निवडणूक हा लोकशाहीचा
सर्वात मोठा उत्सव असून, यात प्रत्येक व्यक्तीला
मतदानाचा अधिकार आहे. मतदान हे प्रत्येकाचे कर्तव्य देखील आहे, याची जाणीव करून देणारे आणि मतदार जनजागृती वर भर देणारे विविध उपक्रम नागपूर
महानगरपालिका मुख्यालय व मनपाच्या दहाही झोन झोन निहाय राबबावे अशा सूचना मनपा
आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी बुधवारी (ता: २३) दिल्या. महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४च्या अनुषंगाने सिस्टिमेटिक
व्होटर्स एज्यूकेशन अँड इलेक्ट्रॉल पार्टीसिपेशन अर्थात ‘स्वीप’ कार्यक्रमांतर्गत
मनपाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाच्या पूर्वतयारी बाबतचा आढावा मनपा
आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी घेतला. मनपा मुख्यालयातील
आयुक्त सभा कक्षात आयोजित बैठकीत मनपाचे अतिरिक्त आयुक्त तथा स्वीपचे नोडल अधिकारी
श्री. अजय चारठाणकर, उपायुक्त डॉ. रंजना
लाडे, उपायुक्त श्री. प्रकाश वराडे, डॉ. गजेंद्र महल्ले, श्री. गणेश राठोड, सहायक आयुक्त श्री.
प्रमोद वानखेडे, श्री.विजय थूल, श्री. नरेंद्र बावनकर, श्री. हरीश राऊत, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, शिक्षणाधिकारी श्रीमती साधना सयाम, क्रीडा अधिकारी डॉ. पियुष आंबुलकर, अधीक्षक अभियंता डॉ.
श्वेता बॅनर्जी, नगर रचना उपसंचालक डॉ. ऋतुराज जाधव यांच्यासह मनपाचे अधिकारी व कर्मचारी
प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी
यांनी सर्व अधिकाऱ्यांनी समन्वयाने करावे, मनपाच्या दहाही झोन निहाय मतदार जागृतीसाठी स्वीप अंतर्गत विविध उपक्रमांचे
योग्य नियोजन करावे, नियोजनाचे वेळापत्रक
तयार करून घ्यावे, लोकसभा निवडणुकीच्या
वेळी ज्या मतदार संघात कमी प्रमाणात मतदान झाले असेल अशा ठिकाणी मतदानाची
टक्केवारी वाढावी याकरिता नागरिकांना जागृत करण्यासाठी विविध उपक्रम राबवावे, शहरातील दर्शनीय भागात मतदान जागृती फलक
लावावेत, युवकांचा सहभाग वाढविण्यासाठी फ्लॅश मॉब व पथनाट्य, विविध स्पर्धा आयोजित कराव्यात, मॉल, रुग्णालय, बाजारपेठेत, महाविद्यालयात विविध जनजागृती उपक्रम राबवावेत, शहराच्या विविध भागात “मतदानांचा उत्सावात” साजरा करण्यासाठी बाईक रॅली, प्रभात फेरी काढण्यात याव्या, सर्व विधानसभा मतदार संघात
अधिकाधिक मतदान करण्यासाठी नागरिकांना आवाहन करावे, हॉटेल, सोसायटी, उंच इमारतीमध्ये नागरिकांना मतदान करण्याचे निवेदन करावे, महाविद्यालय, शाळा आदी ठिकाणी
नागरिकांकडून मतदान संकल्पपत्र भरून घ्यावे, नागरिकांना मतदान करण्यासाठी मनपाच्या कचरा संकलन वाहनांवरून ध्वनीचित्रफित
वाजवीत आवाहन करावे, आदी सूचना मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिल्या.बैठकीच्या सुरुवातीला
अतिरिक्त आयुक्त तथा स्वीपचे नोडल अधिकारी श्री. अजय चारठाणकर यांनी मतदारांचे पद्धतशीर
शिक्षण आणि निवडणूक सहभाग स्वीप कर्यक्रम नागपूर शहरीभागात यशस्वीरीत्या
राबविण्याबाबत ची माहिती दिली.
No comments:
Post a Comment