Tuesday, October 15, 2024

सिव्हिल लाईन्स वॉकर स्ट्रीट येथील स्मार्ट टॉयलेटचे लोकार्पण*

नागपूर:- नागपूर महानगरपालिकेद्वारे सिव्हिल लाईन्स येथील वॉकर स्ट्रीट परिसरातील स्मार्ट स्वच्छतागृहाचेमनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते सोमवारी (ता:१४) लोकार्पण करण्यात आले.या प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर,मनपाच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल, उपायुक्त श्री. प्रकाश वराडे, डॉ. गजेंद्र महल्ले, अधीक्षक अभियंता श्री. मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता (स्लम) श्री. कमलेश चव्हाण, श्री. देवेन्द्र भोवते, वॉकर्स क्लबचे श्री. प्रशांत उगेमुगे, श्री. दिनेश नायडू श्री प्रवीण काळे श्री राहुल घरोटे श्री. संजय चौरसिया, श्री.ब्रिजेश साहू, श्री अभिषेक ठाकूर श्री देवेन अग्रवाल, मनपाचे कनिष्ठ अभियंता 
श्री.मनोज रंगारी श्री.सचिन चावटे, श्री. अरुण पेठेवार, कंत्राटदार श्रीमो कन्स्ट्रक्शनचे श्री. कपिल गुप्ता, श्री. राजीव चौधरी प्रामुख्याने उपस्थित होते.नागपूर महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेले स्मार्ट टॉयलेट अत्याधुनिक सोयी सुविधांनी परिपूर्ण असे आहे. स्मार्ट टॉयलेट वातानुकूलित असून, महिलांसाठी दोन प्रसाधनगृहे व चेंजिंग रूम तर पुरुषांसाठी तीन मुतारी व दोन शौचालयाची सोय आहे. या स्वच्छतागृहाला सेन्सारवर आधारित स्मार्ट प्रवेशद्वार असून ते उघडण्याची वा बंद करण्याची गरज नाही.प्रसाधनगृहाच्यावर सोलर पॅनल बसविण्यात आले आहेत. तसेच तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी रेस्ट रूम ची सोय देखील स्मार्ट टॉयलेट मध्ये आहे. याशिवाय हँड ड्रायर, वॉश बेसिनची महिलांसाठी सुविधा करण्यात आली आहे. स्वच्छतेसोबतच संपूर्ण परिसर सुंदर असावे यासाठी प्रवेशद्वारावर झाडे लावण्यात आलेले आहेत.


मनपाच्या या स्मार्ट स्वच्छतागृहामध्ये मुतारीचा वापर नि:शुल्क असून शौचालयाच्या वापरासाठी ७ रुपये, थंड पाण्याने आंघोळीसाठी २० रूपये आणि गरम पाण्याने आंघोळीसाठी ३० रुपये शुल्क निर्धारित करण्यात आलेले आहे. स्मार्ट स्वच्छतागृहाची योग्य देखरेख व्हावी याकरिता मनपाद्वारे स्वच्छतागृहाच्या वरच्या भागात देखरेख करणा-या कर्मचा-यासाठी खोली तयार करण्यात आलेली आहे.शेकडोच्या संख्येत लोक वॉकर स्ट्रीटवर प्रभात फेरीसाठी येतात यात काही चिमुकले देखील असतात, लहान मुलांकरिता मार्ट स्वच्छतागृहाच्या बाजूला आकर्षक असे डायनासोर चे सेल्फी पॉईंट लावण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने दान केल्या घरातील निरुपयोगी वस्तू -निरुपयोगी वस्तू संकलन/दान केंद्राचे आयुक्त डॉ. चौधरींच्या हस्ते उद्घाटन

  नागपूर : - नागपूर महानगरपालिकेद्वारा स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी अभियानांतर्गत दिवाळीतील निरुपयोगी वस्तू संकलन केंद्र शहरातील विविध ठिकाणी उभ...