Tuesday, October 22, 2024

दिवाळीत घरातील अनुपयोगी वस्तु संकलनासाठी मनपाची १५० केंद्रे

नागपूर :- दिवाळीनिमित्त घरोघरी स्वच्छता केली जाते. आपले शहर हे देखील आपले घरच आहे. स्वच्छते दरम्यान घरातून निघणाऱ्या अनुपयोगी वस्तूंचे संकलन करून त्याचा पुनर्वापर करण्याचा महत्त्वाचा निर्णय नागपूर महानगरपालिकेने स्वच्छ दिवाळीशुभ दिवाळी अभियानंतर्गत घेतला आहे. घरातून निघणाऱ्या वापरात नसणाऱ्या अनुपयोगी वस्तूंचा स्वीकार करण्यासाठी मनपाने दहाही झोन निहाय १५० अनुपयोगी वस्तु संकलन/स्वीकार केंद्रे उभारण्याचा निर्णय घेतला असूनयेत्या २६ ते २८ ऑक्टोबर या कालावधीत नागरिकांनी आपल्या जवळच्या केंद्रावर वर्गीकृत स्वरूपातील अनुपयोगी वस्तु आणून द्यावा व आपल्या शहराला स्वच्छसुंदर व पर्यावरणपूरक साकरण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी’ अभियान संदर्भात मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील आयुक्त सभा कक्षामध्ये मंगळवारी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी विविध माध्यमांशी संवाद साधला. याप्रसंगी मनपाच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयलघनकचरा व्यवस्थापन संचालक तथा उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले प्रामुख्याने उपस्थित होते.स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी’ अभियानाबद्दल माहिती देत आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले कीकेंद्र शासनाच्या 'स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळीया मोहिमे अंतर्गत नागपूर महानगरपालिकेद्वारे २१ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. अभियानांतर्गत येत्या शनिवार २६ ते सोमवार २८ ऑक्टोबर या कालावधीमध्ये मनपाच्या सर्व आरआरआर सेंटरसह प्रभागनिहाय तयार करण्यात आलेल्या १५० अनुपयोगी वस्तु संकलन/स्वीकार केंद्रांवर दिवाळीतील सफाई मध्ये निघणारा पुनर्वापरयोग्य तसेच अन्य अनुपयोगी वस्तु संकलीत केला जाणार आहे. तरी नागरिकांनी आपल्या घरातील पुनर्वापरण्यात येणाऱ्या किंवा निरुपयोगी वस्तु/साहित्य 
जसे कपडेलाकडी वा प्लास्टिकच्या वस्तूघरातील भांडीखुर्च्याखेळणीकपाटचपला /जोडेपुस्तकांची रद्दीइलेक्ट्रॉनिक वस्तू या संकलन केंद्रामध्ये जमा करून गरजुवंताना लाभ देण्यास सहकार्य करावेअसे आवाहनही आयुक्त डॉ. चौधरी यांनी केले.वर्गीकृत स्वरूपात अनुपयोगी वस्तु स्वीकार केंद्रावर जमा करून अभियानात उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शविणाऱ्याच्या नागरिकांचे घरसोसायटीच्या दारावर नागपूर महानगरपालिकेद्वारे थँक यू’ चे  स्टिकर्स लावण्यात येणार आहेत. हे विशेष'स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळीमोहिमे अंतर्गत २१ ते २४ ऑक्टोबर दरम्यान दररोज दहाही झोनमधील वेगवेगळ्या प्रभागांमध्ये 'स्वच्छ दिवाळी सखोल स्वच्छताउपक्रम राबविण्यात येणार आहे. २५ ऑक्टोबर रोजी दहाही झोनमधील १९ दहनघाटांची स्वच्छता अभियान राबविण्यात येईल. २९ आणि ३० ऑक्टोबर रोजी 'हर घर स्वच्छता के साथ दिवालीया थीमसह घरोघरी दिव्यांची सजावट तसेच स्वच्छता संदेश देणारी रांगोळी काढण्यात येईल. या उपक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात शहरातील जनतेचा सहभाग असणार आहे. २५ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीमध्ये मनपाच्या आयईसी चमूद्वारे बाजारपेठ आणि व्यापारी संकुलाच्या परिसरात 'व्होकल फॉर लोकलआणि पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याबाबत जनजागृती करण्यात येणार आहेअसेही डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले.आपल्या शहराला स्वच्छसुंदर व स्वस्थ साकारण्यासाठी नेहमी तत्पर राहणार्या सफाई कर्मचार्यांचा सत्कार मनपाद्वारे केला जाणार आहे. येत्या २७ ऑक्टोबर रोजी शहरातील घराघरातून कचरा संकलीत करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार असूनसोमवार २८ ऑक्टोबर रोजी शहरातील महापुरूषस्वातंत्र्य सेनानींच्या एकूण ५९ पुतळ्यांची व चौकांची स्वच्छता करण्यात येणार आहे.स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी अभिनांतर्गत नागपूर शहरातील विविध मैदानांची स्वच्छता येत्या ४ ते ७ नोव्हेंबर दरम्यान करण्यात येणार आहे. शहरातील मैदाने स्व्च्छ व्हावी याकरिता या उपक्रम हाती घेण्यात आला असूननागरिकांनी देखील मोठ्या संख्येत उपक्रमात सहभागी होत घराप्रमाणे शहराला देखील स्व्चछसुंदर साकारण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी अभियान अंतर्गत  मनपाच्या विविध उपक्रमामध्ये नागरिकनागरिक मंडळ/ समुहअशासकीय संस्था (एनजीओ)स्वयं सहायता समूह (SHG), शाळांचे विद्यार्थीयुथ ग्रुप यांना सहभागी करून घेण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment

नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने दान केल्या घरातील निरुपयोगी वस्तू -निरुपयोगी वस्तू संकलन/दान केंद्राचे आयुक्त डॉ. चौधरींच्या हस्ते उद्घाटन

  नागपूर : - नागपूर महानगरपालिकेद्वारा स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी अभियानांतर्गत दिवाळीतील निरुपयोगी वस्तू संकलन केंद्र शहरातील विविध ठिकाणी उभ...