नागपूर:- विधानसभा निवडणुकीसाठी मतदारांच्या मनात आपल्या राष्ट्रीय कर्तव्याप्रती जागृती निर्माण व्हावी याकरिता ज्येष्ठ नागरिकांनी राष्ट्रासाठी एक तास देत, मतदारांचे प्रबोधन व मार्गदर्शन करण्याच्या राष्ट्रीय कार्यात योगदान द्यावे असे आवाहन नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त तथा स्वीपचे नोडल अधिकारी श्री. अजय चारठाणकर यांनी केले.सिस्टिमेटिक व्होटर्स एज्यूकेशन अँड इलेक्ट्रॉल पार्टीसिपेशन अर्थात ‘स्वीप’ कार्यक्रमांतर्गत नागपूर महानगरपालिकाद्वारे शहरातील विविध ज्येष्ठ नागरिक संस्था संघटनाच्या प्रतिनिधींची व शहरातील हॉकर्स असोसिएशनच्या प्रतिनिधींची शुक्रवारी (ता: २५) मनपाचे अतिरिक्त आयुक्त तथा स्वीपचे नोडल अधिकारी श्री. अजय चारठाणकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात आयोजित बैठकीत मनपाच्या उपायुक्त डॉ. रंजना लाडे, स.वि.प्र. चे सहायक अधीक्षक राजकुमार मेश्राम यांच्यासह ज्येष्ठ नागरिक संघटनाचे प्रतिनिधी व हॉकर्स असोसिएशनचे प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी मार्गदर्शन करीत
मनपाचे
अतिरिक्त आयुक्त तथा स्वीपचे नोडल अधिकारी श्री. अजय चारठाणकर यांनी सांगितले की, लोकशाहीचा उत्सव असणाऱ्या
निवडणूकांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची महत्त्वाची भूमिका आहे. महाराष्ट्र विधानसभा
निवडणुकीत नागपूर शहरातील मतदानाचा टक्का वाढावा व जास्तीत जास्त नागरिकांनी
मतदानासाठी बाहेर पडावे या करिता मतदारांचे प्रबोधन करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी
पुढकार घ्यावा, मनपाद्वारे स्वीप अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमात सक्रीय सहभाग
नोंदवावा. बीएलओ यांच्यावर अवलंबून न राहता, ऐन मतदानाच्या दिवशी धावपळ
टाळण्यासाठी आणि आपले मतदान केंद्र तपासण्यासाठी Voter Helpline
App चा वापर करावा
आणि याबाबत इतरांना देखील मार्गदर्शन करावे, घरातील ज्येष्ठांनी प्रबोधनात्मक
आवाहन केल्याचा मुलांवर नक्कीच सकारत्मक परिमाण होईल,
असा विश्वास श्री. चारठाणकर यांनी
व्यक्त केला.तसेच ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्या
स्तरावर प्रभात फेरी, उद्यानांमध्ये
युवकांचे मार्गदर्शन, विरंगुळा
केंद्रावर मार्गदर्शन, भजन
मंडळांनामार्फत मतदान जागृती करावी याकरिता मनपाचे संपूर्ण सहकार्य मिळेल असे
आवाहन श्री, चारठाणकर यांनी केले. हॉकर्स
असोसिएशने देखील आपल्याकडील आस्थापनांवर मतदान जनजागृती फलक लावावे असे आवाहन ही
श्री. चारठाणकर यांनी केले.‘स्वीप’ कार्यक्रमांतर्गत नागपूर महानगरपालिकेद्वारा शहरातील विविध
ठिकाणी मतदान जनजागृती फलक लावण्यात येत आहेत. यातील सेल्फी पाॅईट वर
ज्येष्ठ नागरिकांनी आपला सेल्फी घेत तो स्टेट्स वर ठेवावा व इतरांना देखील
प्रोत्साहित करावे असे आवाहन श्री. चारठाणकर यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment