Wednesday, March 13, 2024

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या ९० प्रकरणांची....उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर:- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवरकचरा फेकणाऱ्यांवरथुंकणाऱ्यांवर५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे.बुधवार  (ता: १३) रोजी उपद्रव शोध पथकाने ९० प्रकरणांची नोंद करून ४१ हजार ३०० रुपयाचा दंड वसूल केला.शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावरफुटपाथवर कचरा टाकणारेथुंकणारेघाण करणारेलघुशंका करणारेप्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु आहे. हाथगाडयास्टॉल्सपानठेलेफेरीवालेछोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात 
अस्वच्छता (रु. ४००/- दंड) या अंतर्गत २९ प्रकरणांची नोंद करून ११ हजार ६०० रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ताफुटपाथमोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत १० प्रकरणांची नोंद करून १००० रुपयांची वसुली करण्यात आली.दुकानदाराने रस्ताफुटपाथमोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे याअंतर्गत ०९ प्रकरणांची नोंद करून ३६०० रुपयांची वसुली करण्यात आली.  मॉलउपहारगृहे लॉजिंगबोर्डींग हॉटेल,  सिनेमा हॉल मंगल कार्यालय कॅटरर्स

सर्व्हीस प्रोव्हायडर आदींवर रस्तावर कचरा टाकणे याअंतर्गत  प्रकरणांची नोंद करून ४००० रुपयांची वसुली करण्यात आलीचिकन सेंटर मटन विक्रेता यांनी कचरा रस्ताफुटपाथमोकळी जागा अशा ठिकाणी टाकणे याअंतर्गत  प्रकरणांची नोंद करून १००० रुपयांची वसुली करण्यात आलीवाहतुकीचा रस्ता मंडपकमानस्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत ०५ प्रकरणांची नोंद करून ०४ हजार ५०० रुपयांची वसुली करण्यात आली.वर्कशॉपगराज व इतर दुरुस्तीचे व्यावसायिकांने रस्ता फुटपाथ मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत ०३ प्रकरणांची नोंद करून ०३ हजार रुपयांची वसुली करण्यात आली. सार्वजनिक रस्ताफुटपाथमोकळी जागा इत्यादी ठिकाणी बांधकामाचा मलाबा/ टाकावू कचरा टाकणे/ साठवणे प्रथम या अंतर्गत ०१ प्रकरणांची नोंद करून ०१ हजार रुपयांची वसुली करण्यात आली. 



उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती  असल्यास २३ प्रकरणांची नोंद करून ४,६०० रुपये दंड वसूल करण्यात आला. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास ०७ प्रकरणांची नोंद करून ०७ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे बुधवार  (ता: १३) रोजी प्रतिबंधक प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या ०५ प्रकरणांची नोंद करून २५ हजार रुपयाचा दंड वसूल केला. याशिवाय रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविणे या अंतर्गत धंतोली झोन येथील मे. जैन समाज सांस्कृतिक भवनरेशीमबाग  यांच्यावर कार्यवाही करीत ०५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. अशा  एकूण ०४ प्रकरणाची नोंद करून २० हजार दंड वसूल करण्यात आला.

No comments:

Post a Comment

अंबाझरी, फुटाळा व गोरेवाडा तलावांवर सुरक्षेच्या उपाययोजना नागरिकांनी सुरक्षेच्या सूचनांचे पालन करावे

नागपूर - शहरातील अंबाझरी ,  फुटाळा व गोरेवाडा तलाव ओव्हर फ्लो होण्याची शक्यता लक्षात    घेऊन नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने तसेच...