नागपूर:- नागपूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना
पंत यांनी मंगळवारी (ता. २९) गोरेवाडा व जागनाथ बुधवारी नागरी प्राथमिक आरोग्य
केंद्रांना भेट दिली व पाहणी केली. त्यांनी दोन्ही आरोग्य केंद्रांमध्ये सुरु
असलेल्या टेलिमेडिसिन सेवेचा आढावा घेतला.यावेळी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक
सेलोकर, मंगळवारी झोनचे झोनल वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अतिक खान, सतरंजीपुरा झोनच्या झोनल वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुलभा
शेंडे, गोरेवाडा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय
अधिकारी डॉ. समीरा खान, जागनाथ बुधवारी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय
अधिकारी डॉ. देवेंद्र कळमकर, डॉ. रुचिता चवरे, डिजिस्वास्थ्य फाउंडेशनचे प्रकल्प व्यवस्थापक श्री. अशोक
कुमार आणि प्रकल्प समन्वयक श्री. प्रांजल सुहागपुरे उपस्थित होते.नागपूर
महानगरपालिकेच्या गोरेवाडा व जागनाथ बुधवारी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये
डब्ल्यूसीएल च्या सीएसआर
निधीमधून प्रायोगिक तत्वावर 'टेलिमेडिसिन'ची सुरुवात करण्यात आलेली आहे. या 'टेलिमेडिसिन' सुविधेचे संचालन डिजिस्वास्थ्य फाउंडेशनद्वारे केले जात
आहे. अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत यांनी दोन्ही आरोग्य केंद्रांमध्ये सुरु
असलेल्या 'टेलिमेडिसिन' सेवेबा बत सविस्तर माहिती जाणून घेतली. या सेवेमार्फत
रुग्णांचे समुपदेशन, तपासणी आणि उपचार या सर्व प्रक्रिबाबत देखील त्यांनी
विस्तृत माहिती घेतली व आढावा घेतला. मनपाच्या दहाही झोनमध्ये प्रत्येकी एक नागरी
प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ही सुविधा सुरु करण्याचा मानस यावेळी अतिरिक्त
आयुक्तांनी व्यक्त केला.
काय आहे टेलिमेडिसिन
सुविधा?:- मनपाच्या
नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या ज्या रुग्णाला
तज्ज्ञांच्या सल्ल्याची आवश्यकता असेल त्यांना 'टेलिमेडिसिन'मार्फत व् हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तज्ज्ञांकडून मोफत सल्ला
देण्यात येतो. रुग्णाला पुढील उपचाराची आवश्यकता असल्यास त्यांना तज्ज्ञांच्या
सल्ल्याने पुढील उपचार करण्यात येतात. शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास महात्मा
ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत योजना (पीएम-जेएवाय) यासारख्या केंद्र व राज्य
शासनाच्या आरोग्य योजनांचा देखील लाभ मिळवून देण्यात येतो. यासाठी देशातील विविध
भागातील स्त्रीरोग तज्ज्ञ, न्यूरोलॉजिस्ट, ऑन्कोलॉ जिस्ट, ऑर्थोपेडिक्स, डर्मेटोलॉ जिस्ट, इएनटी, डेंटिस्ट, ग्रॅस् ट्रोनेट्रोलॉजी, हृदयरोगतज्ज्ञ, ऑप्थेंमोलॉजिस्ट, नेफ्रोलॉजिस् ट, फिजिओथेरेपिस्ट, डायटिशियन, जनरल मेडिसिन आणि बालरोगतज्ञांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
ते आठवड्यातील निर्धारित दिवशी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत सेवा देतात.
रुग्णांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी आणि उपचाराबाबत नियमित फॉलोअप देखील घेतले
जाते.
No comments:
Post a Comment