नागपूर:- शहरातील विविध भागातील वारसा स्थळांच्या
संदर्भात नागपूर हेरीटेज संवर्धन समितीची बैठक समितीचे अध्यक्ष मा. श्री. अनुप कुमार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता.29) मनपा मुख्यालयातील श्री. छत्रपती शिवाजी महाराज
प्रशासकीय इमारतीत पार पडली. बैठकीत मुख्य अभियंता लीना उपाध्ये, नगररचना विभागाचे सहायक संचालक श्री.ऋतुराज जाधव, एमएसआयडीसीचे अधीक्षक अभियंता श्री. प्रकाश
पांग्रृत उपअभियंता
श्री. राजीव गौतम, इनटॅक लोकल चॅप्टरच्या समन्वयक श्रीमती मधुरा राठोड, रातुम नागपूर विद्यापीठाच्या माजी इतिहास विभाग
प्रमुख डॉ. शुभा जोहरी, पुरातत्व
विभागाचे अधीक्षक श्री. अरुण मलिक, उपअभियंता
श्री. विवेक तेलरांधे, आर्किटेक्चर वेद पुरनेन्दु प्रकाश उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास
महामंडळाचे (एमएसआयडीसी) अधीक्षक अभियंत्यांनी नागपूर येथे विभागीय आयुक्त
कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच इतर शासकीय
कार्यालयाच्या इमारतींचे एकत्रित प्रस्तावित बांधकामासाठी ना हरकत प्रमाणपत्र
घेण्यापासून सवलत देण्याचा प्रस्ताव नागपूर हेरीटेज संवर्धन समितीला सादर केला. यावेळी नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन प्रशासकीय
इमारतीचे बांधकाम हेरिटेज इमारत (जुने कोषागार इमारत) पासून 108 मीटर
दूर करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी हेरीटेज समितीला माहिती दिली. यावर समितीने
समाधान व्यक्त केले. याचबरोबर जागनाथ बुधवारी येथील श्री. जागृतेश्वर
देवस्थानाबाबत प्रस्तावावर चर्चा करण्यात आली.
No comments:
Post a Comment