नागपूर:- नागपूर महानगरपालिकेद्वारे आयसोलेशन हॉस्पीटल
परिसरामध्ये केंद्रीय औषधी साठवणूक केंद्र साकारले जाणार आहे. या प्रस्तावित
कार्यासंदर्भात मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी मंगळवारी (ता.१)
इमामवाडा येथील आयसोलेशन हॉस्पीटल परिसराची पाहणी केली व आवश्यक सूचना नोंदविल्या. यावेळी उपायुक्त श्री. विजय देशमुख, अधीक्षक अभियंता श्री. मनोज तालेवार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, धंतोली झोनचे सहायक आयुक्त श्री. प्रमोद वानखेडे, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, कार्यकारी अभियंता श्रीमती अल्पना पाटणे, श्री. अजय पाटील, अतिरिक्त
वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, झोनल
वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. शीतल वांदिले, उपअभियंता
श्री.राजीव गौतम, श्री.
राजीव गौतम, आयसोलेशन हॉस्पीटलच्या प्रभारी डॉ.
मेघा जैतवार, भांडार प्रभारी श्री. पृथ्वीसिंग
राठोड, आर्कीटेक्ट श्री. त्रिलोक ठाकरे
आदी उपस्थित होते.मनपा
आयुक्तांनी आयोसोलेशल हॉस्पीटल परिसरात प्रस्तावित औषधी
साठवणूक केंद्राच्या इमारतीसंदर्भात माहिती जाणून घेतली. येथील १५ हजार वर्ग फुट
जागेमध्ये केंद्रीय औषधी साठवणूक केंद्र तयार करण्याचे प्रस्तावित आहे. या
केंद्रामधून मनपाचे सर्व रुग्णालय तसेच सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य वर्धिनी केंद्र येथे औषधांचा पुरवठा करण्यात
येईल. सदर प्रस्तावित इमारतीमध्ये महत्वाच्या बैठकीसाठी सभागृह तसेच कार्यालय
देखील तयार केले जाणार असल्याची माहिती यावेळी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक
सेलोकर यांनी आयुक्तांना दिली.यापूर्वी आयुक्तांनी आयसोलेशन हॉस्पीटल ची पाहणी
केली. त्यांनी औषध भांडार कक्ष, महिला
व पुरुष वार्ड, चाचणी केंद्राला भेट देऊन पाहणी
केली. हॉस्पीटलचा संपूर्ण रेकॉर्ड डिजिटल यंत्रणेत अद्ययावत करण्यात येत
असल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केला.
No comments:
Post a Comment