Wednesday, April 9, 2025

उष्माघाताचा धोका वाढतोय ; नागपुरकरांनो आरोग्य सांभाळा नागपूर महानगरपालिकेची आरोग्य यंत्रणा सज्ज

नागपूर:- मागील काही दिवसांपासून सतत तापमान वाढत आहे. नागपूर शहरातील तापमान ४० अंशाच्या पुढे गेले आहे. पुढेही तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उष्माघाताचा धोका वाढला आहे. उदभवणाऱ्या आरोग्याच्या मस्या टाळण्यासाठी खबरदारी घेऊन आरोग्य जपावेअसे आवाहन नागपूर महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी नागपुरकरांना केले आहे.वाढत्या तापमानामुळे संभावणारा उष्माघाताचा धोका लक्षात घेता मनपाची आरोग्य यंत्रणा सज्ज झालेली आहे. यासंदर्भात अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत यांनी मनपाचे इंदोरा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि इंदिरा नगर झोपडपट्टी जरीपटका येथील आयुष्मान आरोग्य मंदिर नागरी आरोग्य वर्धिनी केंद्रांना भेट देऊन पाहणी केली.नागपूर शहरात उष्माघात 
प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात आली आहे. मनपाचे रुग्णालय तसेच शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथे कोल्ड वार्ड तयार करण्यात आलेले आहेत. यासोबतच मुबलक प्रमाणात औषधांचा साठा देखील उपलब्ध करण्यात आलेला आहे. शहरातील संभाव्य उष्माघात प्रभावित ठिकाणे तसेच अन्य भागातही प्याऊची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच शहरातील सर्व उयाने सुदधा दुपारच्या वेळी सुरु ठेवण्यात येत आहेत. याशिवाय दहाही झोनस्तरावर नागरिकांना जनजागृती पत्रक वितरीत करुन त्यांना उष्माघातबाबत जागरुक केले जात आहेअशी माहिती देखील मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी दिली आहे.
#उष्माघाताची लक्षणे:-शरीराचे तापमान वाढल्यास त्याला उष्माघात म्हणतात. मळमळउलटीतापत्वचा कोरडी पडणेथकवाचक्करडोकेदुखीमनाची स्थिती बिघडतेचिडचिडजीभ जड होणेजास्त घाम येणेपायात गोळे येणेपोटऱ्यात वेदनारक्तदाब वाढणेमानसिक बेचैनीबेशुद्धावस्था. उष्माघात टाळण्यासाठी अशी काळजी घ्या:- नागरिकांनी कामाशिवाय उन्हात निघणे टाळावे.उन्हात जाण्याची वेळ आल्यास योग्य खबरदारी घेतली जावी.उन्हाच्या वेळेत बाहेर फिरणे टाळावेभरपूर पाणी प्यावे. स्वत:सह इतरांच्याही तब्येतीची काळजी घ्यावी हलकीपातळ व सच्छिद्र कपडे वापरावीत बाहेर जाताना गॉगल्सछत्री किंवा हॅटबूट किंवा चप्पलचा वापर करावाप्रवासादरम्यान पाण्याची बाटली सोबत ठेवावीउन्हात काम करताना हॅट किंवा छत्रीचा वापर करावा.ओल्या कपड्याने डोकेमानचेहरा झाकणेशरीरात पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएसलिंबूपाणीताक आदी पेय नियमीत पिणेघर थंड ठेवण्यासाठी ओलसर पडदेपंखाकुलर आदींचा वापर करावा.हे करणे टाळा:- उष्माघात टाळण्यासाठी उन्हाच्या वेळेत घराबाहेर जाणेउन्हात कष्टाची कामे करणे टाळा.लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नका. गडदघट्ट व जाड कपडे परिधान करणे टाळावेउन्हात स्वयंपाक करणे टाळावेस्वयंपाक करताना स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवावीत. मद्यचहाकॉफीसॉफ्टड्रिंक्स ही पेय टाळावीशिळे आणि उच्च प्रथिने असलेले अन्न खाणे टाळावे.

No comments:

Post a Comment

अंबाझरी, फुटाळा व गोरेवाडा तलावांवर सुरक्षेच्या उपाययोजना नागरिकांनी सुरक्षेच्या सूचनांचे पालन करावे

नागपूर - शहरातील अंबाझरी ,  फुटाळा व गोरेवाडा तलाव ओव्हर फ्लो होण्याची शक्यता लक्षात    घेऊन नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने तसेच...