Tuesday, April 15, 2025

महापालिकेच्या आपली बसच्या प्रवाशांसाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डचे लोकार्पण आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते शुभारंभ

नागपूर:- महापालिकेच्या आपली बसमध्ये आता प्रवाशांना नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डची सुविधा उपलब्ध झाली आहे. या कार्डचे लोकार्पण महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते मंगळवारी (ता. १५)  महापालिकेच्या मुख्यालयातील आयुक्तांच्या सभाकक्षात झाले. डीजीटल प्रथम व भविष्यासाठी सज्ज होण्याच्या दिशेने नागपूर महापालिकेने एक मोठे पाऊल टाकले आहे.यावेळी अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंतपरिवहन व्यवस्थापक श्री. विनोद जाधवश्री. रविंद्र पागे, श्री. राजू घाटोळे, श्री. योगेश लुंगे, श्री. विनय भारद्वाज, श्री. अरुण पिंपुरडे, श्री. केदार मिश्रा व श्री. समीर परमार आदी उपस्थित होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एक देशएक कार्डच्या संकल्पनेला मूर्त  देण्याच्या दृष्टीने महापालिकेने हे पाऊल टाकले आहे. रोखविरहित व्यवहारांना चालना देण्यासाठी तसेच आपली बसमध्ये प्रवास करणार्या प्रवाशांना यापुढे रोख रक्कम बाळगण्याची गरज राहणार नाही. नागपूर महापालिकेने तंत्रज्ञान भागीदार चलोसोबत सहकार्य करीत नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) सुरू केले आहे. यामुळे सर्व सार्वजनिक प्रवासासाठी एकत्रित डीजीटल सुविधेमुळे प्रवाशांना प्रवास करणे सुलभ होणार आहे.यावेळी बोलताना महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी म्हणालेआपली बसमध्ये यापुढे केवळ हेच कार्ड व्यवहारात राहणार आहे. महापालिकेने यापूर्वी 

जारी केलेले सर्व कार्डची सुविधाही कायम राहणार असून या कार्डची मुदत संपल्यानंतर मात्र प्रवाशांना एनसीएमसी कार्ड जारी करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.नागपूर मेट्रोमध्ये अद्याप एनसीएमसी कार्डचा वापर सुरू झालेला नाहीकार्डचा वापर महामेट्रोमध्ये सुद्धा करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. महामेट्रो तसेच तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यानंतर महामेट्रोमध्ये सुद्धा लवकरच एनसीएमसी कार्डचा वापर करता येणार आहे.यानंतर नागपुरातील प्रवाशांना महामेट्रो व आपली बससाठी वेगवेगळे कार्ड जवळ ठेवण्याची गरज राहणार नाही. जुने कार्ड असलेल्या प्रवाशांना नव्या कार्डसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नसल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.हेच कार्ड रिटेल स्टोअर्सरेस्टॉरंट-कॉमर्ससाठी सुद्धा वापरता येणार आहे, हे एनसीएमसीच्या कार्डचे वैशिष्ट्ये आहे. हे कार्ड वाडीहिंगणापटवर्धन मैदान आणि नाका क्रमांक १३ येथील बस डेपोमध्ये उपलब्ध राहणार आहे. तसेच या कार्डचे रिचार्ज ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. एनसीएमसी कार्ड बसपास सेंटरबसचे कंडक्टरजवळून सुद्धा घेता येईल. हे कार्ड रिचार्ज करण्याची सुविधा चलो कार्ड अॅपवरसुद्धा देण्यात आलेली आहे. 

No comments:

Post a Comment

अंबाझरी, फुटाळा व गोरेवाडा तलावांवर सुरक्षेच्या उपाययोजना नागरिकांनी सुरक्षेच्या सूचनांचे पालन करावे

नागपूर - शहरातील अंबाझरी ,  फुटाळा व गोरेवाडा तलाव ओव्हर फ्लो होण्याची शक्यता लक्षात    घेऊन नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने तसेच...