Tuesday, July 30, 2024

सूफी संतों ने मानव कल्याण की तालीम दी बाबा ताजुद्दीन के सालाना उर्स पर मौलाना हाश्मी मियां ने दिया संदेश

नागपुर:- हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्ट के तत्वावधान में ताजबाग में बाबा सैयद मोहम्मद ताजुद्दीन रहमतुल्लाह अलैह के १०२वें सालाना उर्स के अवसर पर विश्व प्रसिद्ध इस्लामी धर्मगुरु मौलाना सैयद हाश्मी मियां की तक़रीर का आयोजन किया गया। इससे पूर्व दरगाह में मिलाद शरीफ हुआ। तक़रीर कार्यक्रम में प्रमुख रूप से मदरसा जामिया अरबिया इस्लामिया के मुफ़्ती अब्दुल कदीर खान, मौलाना समदानी मियां, हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्ट के चेकरमैन प्यारे खान, उपाध्यक्ष डॉ सुरेंद्र जिचकार, सचिव ताज अहमद राजा, ट्रस्टी हाजी 
फरूखभाई बावला, गजेंद्रपाल सिंह लोहिया, इमरान खान ताज़ी, मुस्तफाभाई टोपीवाला आदि उपस्थित थे। मंच संचालन गयासुद्दीन अशरफी ने किया। कार्यक्रम में संबोधित करते हुए धर्मगुरु मौलाना सैयद हाश्मी मियां ने कहा की हिन्दुस्तान एक ऐसा मुल्क है जो पूरी दुनिया की विशेषताओं को समेटे हुए है। यहां अलग अलग मौसम, वातावरण वाले इलाके है, इसी तरह यहाँ कई धर्मों और विचारों के लोग है, लेकिन सब बड़े प्यार से मिलकर रहते है, क्यूंकि यहीं इस देश की सबसे खूबसूरत संस्कृति है और यह तालीम हमें सूफी संतों से 
मिली है। सूफी संतों ने देश को सर्वधर्म समभाव की शिक्षा दी है। मानव कल्याण की तालीम दी है। मौलाना हाश्मी मियां ने कहा की बाबा ताजुद्दीन ने भी सभी को मानवता की तालीम दी।  आज उनके दरगाह पर पूरी दुनिया से लोग आते है। इनमे हिन्दू-मुस्लिम सभी शामिल होते है। हम सब को सूफी संतों द्वारा गताये गए मार्ग पर चलकर प्रेम से मिलकर रहना चाहिए, इससे देश की उन्नति होगी।

प्रत्येकाने अवयवदानाचा संकल्प करायला हवा- डॉ. दीपक सेलोकर यांचे आवाहन

नागपूर:तुम्ही दिलेला अवयव एका व्यक्तीचे नाही तरअनेक व्यक्तींचे जीवन बदलू शकतो. त्यांच्या जीवनात आनंद आणू शकतोप्रत्येकाने अवयवदानाचा संकल्प करायला हवा आणि अवयवदानाची सुरुवात स्वतःपासून करायला हवीअसे आवाहन मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी केले.नागपूर महानगरपालिका आरोग्य विभाग आणि विवेका हॉस्पिटलविवेका मेडिकल रिसर्च फाउंडेशन यांच्न्या संयुक्त विद्यमान सोमवारी (ता:२९)  मनपात अवयवदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी मनपाचे अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवारडॉ. विजय जोशीसाथरोग अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरेविवेका हॉस्पिटलचे डॉ. प्रणवकुमार झानागपूर स्मार्ट सिटी पर्यावरण विभागाच्या महा व्यवस्थापक डॉ. प्रणिता उमरेडकरमनपाचे नगर रचनाकार श्री. ऋतुराज जाधवझोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील कांबळेडॉ. ख्वाजा मोईनुद्दीनवाहतूक 
उप अभियंता श्री. राहुल देशमुख विवेका हॉस्पिटलचे श्री. वैभव ठाकरेश्री. प्रणव झोल्ले यांच्यासह शिक्षणविभाग अग्निशमन विभागाचे प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमात सर्वप्रथम  विवेका हॉस्पिटलचे डॉ. प्रणवकुमार झा  यांनी संगकीयसादरीकरण करीत अवयवदानाविषयी माहिती दिली. डॉ. प्रणवकुमार झा यांनी सर्वसामान्य नागरिकांमध्ये अवयवदाना विषयी असणारे गैरसमज आणि चुकीच्या धरणांवर प्रकाश टाकतअवयवदाना संदर्भात अधिक जनजागृती व्हावी अशी मनीषा व्यक्त केली. तसेच कुणी अवयवदान करण्याचा संकल्प घेतला असेल तर त्यांनी ही बाब आपल्या कुटुंबातील सदस्यांना जरूर सांगावी असे आवाहनही डॉ. झा यांनी केले. यावेळी सर्वांनी अवयवदानाची शपथही घेतली.तर मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी प्रत्येक नागरिकाने अवयवदानाचा संकल्पकरून राष्ट्रीय अवयव आणि ऊतक प्रत्यारोपण संघटनेच्या” (NOTTO)  अधिकृत संकेतस्थळावर जाऊन  अवयवदानाची प्रतिज्ञा घ्यावीअवयवदानाची सुरुवात स्वतःपासून करावीइतरांना देखील अवयवदानासाठी प्रेरित करावे असे आवाहन केले. अवयवदानाची प्रतिज्ञा घेत कार्यक्रमाची सांगता झाली. 

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 60 प्रकरणांची नोंद उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर:- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. मंगळवारी (30) रोजी शोध पथकाने 60 प्रकरणांची नोंद करून 30900 रुपयाचा दंड वसूल केला. सार्वजनिक  ठिकाणी रस्ता फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी थुंकणे (रु. 200/- दंड) या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 200 रुपयांची वसुली करण्यात आली. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 19 प्रकरणांची नोंद करून 7600 रुपयांची वसुली करण्यात आली. कोणत्याही व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत 3 प्रकरणांची नोंद करून 300 रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता
फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 3 प्रकरणांची नोंद करून 1200 रुपयांची वसुली करण्यात आली. मॉलउपहारगृहेलॉजिंगबोर्डींग हॉटेलसिनेमा हॉलमंगल कार्यालयकॅटरर्स सर्व्हीस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता या अंतर्गत 2 प्रकरणांची नोंद करून 4000 रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 12 प्रकरणांची नोंद करून 8000 रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 13 प्रकरणांची नोंद करून 2600 दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 7 प्रकरणांची नोंद करून 7000 दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.तसेच उपद्रव शोध पथकाने गांधीबाग झोन अंतर्गत मे. मधुर महाल होटल यांच्यावर प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. 5,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. तसेच सतरंजीपूरा झोन अंतर्गत मे. कुंरेकर अगरबत्ती शॉप यांच्यावर प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. 5,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. उपद्रव शोध पथकाने 2 प्रकरणांची नोंद करून रू. 10,000/- दंड वसूल केला.

शहर में 7 और सक्शन जेटिंग मशीनें लगेंगी

नागपुर:- सीवरेज लाइनों के जाम होने से आम लोगों की परेशानी को देखते हुए नागपुर महानगरपालिका के नगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी ने मानसून के लिए विशेष रूप से 4 और सक्शन कम जेटिंग मशीनें किराए पर लेने की पहल की है। इन 4 वाहनों में से 3 पहले ही शहर में पहुंच चुके हैं और चौथा अगले 10 दिनों में आने की उम्मीद है। शुरुआत में 10 प्रशासनिक क्षेत्रों में प्रत्येक में 1 जेटिंग मशीन थी। वर्ष 2010 में, एनएमसी ने पहली बार 3000 लीटर क्षमता वाली 2 सक्शन मशीनों के लिए निविदा आमंत्रित की थी। वर्ष 2011-12 
में, 2 रिसाइकिलर्स के लिए निविदा आमंत्रित की गई थी। शहर में २०१८ तक २ रिसाइक्लर थे, जिन्हें बाद में २०२३ तक ५ तक बढ़ा दिया गया। इसके अलावा, २०२४ में संकीर्ण और भीड़भाड़ वाली गलियों से निपटने के लिए मनपा द्वारा ३ छोटी सक्शन कम जेटिंग मशीनें भी किराए पर ली गई थीं। हालांकि बारिश के बाद भारी गाद को ध्यान में रखते हुए और लोगों को अपने परिसर में गंदे पानी के जमाव से राहत देने के लिए, मनपा आयुक्त ने शहर के लिए ३ बड़ी (१०००० लीटर) और १ छोटी (३००० लीटर) सक्शन कम जेटिंग मशीन किराए पर लेने का फैसला किया है। इसका मतलब है कि इस सप्ताह सोमवार से शहर में ऐसी २१ मशीनें चलेंगी। ११ वाहन तय समय के अनुसार जोनों को उपलब्ध कराए जाएंगे। मनपा आयुक्त ने जोनल अधिकारियों को मशीनों का विवेकपूर्ण उपयोग करने और अधिक से अधिक शिकायतों का समाधान करने को कहा है।

बाबा ताजुद्दीन के परचम में श्रद्धालुओं का उमड़ा जनसैलाब

नागपुर:- सर्वधर्म समभाव के प्रतिक हजरत बाबा सैयद मोहम्मद ताजुद्दीन रहमतुल्लाह अलैह के सालाना उर्स का शुभारंभ परचम कुशाई की रस्म अदायगी से हुआ. सुबह से ही ताजाबाद में श्रद्धालुओं का जनसैलाब उमड़ पड़ा. सैकड़ों श्रद्धालुओं की मौजूदगी एवं अमीरे शरीयत मुफ़्ती अब्दुल कदीर खान की अध्यक्षता में परंपरागत तरिके से पंचम राजे रघुजी भोसले के हाथों दरगाह परिसर में परचम कुशाई की गई. इस दौरान परिसर में बाबा ताजुद्दीन की शान में कलाम पढ़े गए. पश्चात दुआ मांगी गई. साथ ही श्रद्धालुओं को तबर्रुक (प्रसाद) वितरित किये गए.इसके बाद उर्स के डॉम में हजरत ताजुद्दीन ट्रस्ट के तत्वावधान में सालाना उर्स का उद्घाटन कार्यक्रम आयोजित हुआ. उद्घाटन कार्यक्रम की शुरुवात कुराने पाक की तिलावत से हुआ. पश्चात ट्रस्टियों की मौजूदगी में ताजाबाद ट्रस्ट के सचिव ताज अहमद राजा ने पंचम राजा रघुजी भोसले की दस्तारबंदी की, साथ अन्य अतिथियों का इस्तकबाल किया गया.इस 
अवसर पर मुस्लिम धर्मगुरु मौलाना समदानी मियां साहब, मुफ़्ती अब्दुल कदीर, हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्ट के चेयरमैन प्यारे जिया खान, उपाध्यक्ष डॉ सुरेंद्र जिचकार, सचिव ताज अहमद राजा, ट्रस्टी हाजी फारूख बावला, गजेंद्रपाल सिंह लोहिया, मुस्तफाभाई टोपीवाला, हाजी इमरान खान ताज़ी एवं सज्जादानशीन बाबा युसूफ इक़बाल ताज़ी, जरबीर बाबा ताज़ी, ताजाबाद शाही मस्जिद के इमाम खुर्शीद आलम ताज़ी, पूर्व मंत्री अनीस अहमद, हजरत बाबा ताजुद्दीन दरगाह खुद्दाम चैरिटेबल ट्रस्ट के अध्यक्ष सैयद मोबीन ताज़ी उपस्थित थे. मंच संचालन गयासुद्दीन अशरफी ने किया. इस अवसर पर  मुस्लिम धर्म गुरु मौलाना समदानी मियां साहब ने अपने विचार व्यक्त करते हुए बाबा ताजुद्दीन रहमतुल्लाह अलैह की शान बयान की. स्थानीय लोगों का सहयोग जरुरी : प्यारे खान  उद्घाटन 
कार्यक्रम के मौके पर हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्ट के चेयरमैन प्यारे खान ने कहा की बाबा पर हर धर्म समुदाय के लोग आस्था रखते है. हम यहाँ ताजाबाद में शिक्षा के क्षेत्र में अच्छा विकास करने के लिए प्रयासरत है. हमारा मकसद है की स्थानीय लोगों को बेहतर सुवधाओं के साथ ही अच्छा वातावरण भी मिले उन्होंने कहा की ट्रस्ट के पैसे का सही इस्तेमाल हम करेंगे. यहां के लोग हमें सहयोग करें. स्थानीय लोगों का सहयोग जरुरी है. हम यहाँ कोई गलत गतिविधि नहीं चलने देंगे. आने वाले दिनों में यहाँ एक स्कूल, बाबा की जमीन की वॉल कम्पाउंडिंग करेंगे. श्रद्धालुओं के लिए अच्छी सुविधा पर जोर रहेगा. इस बार भी हमने श्रद्धालुओं की सुविधा व सुरक्षा के लिए विशेष ध्यान रखा है. सभी पहलुओं पर ट्रस्ट काम कर रही है : ताज अहमद राजा ताजाबाद ट्रस्ट के सचिव ताज अहमद राजा ने कहा की जब नयी ट्रस्ट आई तो काफी अव्यवस्था थी और हमने यहाँ कई सुधार किये. ट्रस्ट की आमदनी को भी माईनस से लाभ में तब्दील करने का 

काम किया और कई शैक्षणिक, स्वास्थ्य व सामाजिक सुधार की पहल भी की. आज यहां ट्रस्ट के माध्यम से अस्पताल, स्कूल भी डेवलप की है. पहले लंगर की सेवा तीन दिन थी हमने इसे बढ़ाया है. ट्रस्ट सभी पहलुओं पर काम कर रही है और भविष्य में यहाँ एक बड़ी स्कुल स्थापित करेंगे. ट्रस्ट पर भरोसा, मेडिकल कॉलेज भी लाएंगे : अनीस अहमद उद्घाटन कार्यक्रम के मौके पर पूर्व मंत्री अनीस अहमद ने कहा की मौजूदा ट्रस्ट ने यहाँ काफी अच्छा काम किया है. साथ ही राज्य सरकार से यह अनुरोध है की सरकार देश भर से आने वाले श्रद्धालुओं के लिए निशुल्क सुविधा प्रदान कराएं. उन्होंने यह भी कहा की प्यारे खान अपने जेब से पैसे निकालकर काम करते है. ट्रस्ट को एक बहेतरीन व्यक्ति मिला है सभी लोगों को उनका साथ देना चाहिए. मुझे यकीन है यहाँ वे न सिर्फ स्कूल बल्कि मेडिकल कॉलेज भी लाएंगे. 

Friday, July 26, 2024

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ७६ हजार अर्ज जमा

नागपूर:- महाराष्ट्र शासनाद्वारे सुरु करण्यात आलेल्या मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेकरिता नागपूर महानगरपालिकेद्वारे सुरू असलेल्या प्रभागनिहाय अर्ज स्वीकृती केंद्रांवर लाभार्थी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मनपाच्या दहाही झोनमधील प्रभागनिहाय अर्ज स्वीकृती केंद्र आणि आंगणवाडी केंद्रांवर आतापर्यंत ७६०३२ अर्ज जमा झाले आहेत. पात्र महिलांनी विहित मुदतीपूर्वी आपले अर्ज भरण्याचे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेद्वारे २.५ लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या परिवारातील महिलांना प्रतिमाह १५०० रुपये आर्थिक सहकार्य मिळणार आहे. या योजनेचा शहरातील जास्तीत जास्त महिलांना लाभ व्हावा यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या सर्व झोन कार्यालयांमध्ये तसेच प्रत्येक प्रभागामध्ये अर्ज स्वीकृती केंद्र सुरू करण्यात आले आहेत. अर्ज स्वीकारताना महिलांना कागदपत्रांची योग्य माहिती देणे तसेच त्यांच्या शंकांचे निराकरण करण्याचे देखील काम या केंद्रांवरून केले जाते. मनपाचे झोन कार्यालय तसेच प्रत्येक झोनमधील प्रभागात अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. याशिवाय आंगणवाडी केंद्रांमध्ये देखील अर्ज स्वीकारले जात आहेत. या व्यतिरिक्त लाभार्थी महिलांना स्वत: नारी शक्ती दूत’ या मोबाईल ॲप वरूनही अर्ज करता येतो. ॲपमध्ये नावपत्तायासोबतच इतर माहिती भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज स्वीकारला जातोअशी माहिती समाजविकास विभागाच्या उपायुक्त डॉ. रंजना लाडे यांनी दिली.नागपूर शहरातील प्रत्येक पात्र महिलेला मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा यासाठी मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी तसेच अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी झोनचे सहायक आयुक्तांशी बैठक घेतली आहे. याशिवाय त्यांनी स्वत: अर्ज स्वीकृती केंद्रांना भेट देउन प्रक्रियेची पाहणी देखील केली आहे. जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या जवळच्या अर्ज स्वीकृती केंद्रात आवश्यक कागदपत्रांसह भेट देण्याचे आवाहन  मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.मनपाच्या दहाही झोनमध्ये आतापर्यंत एकूण ३३०३७ अर्ज जमा झाले आहेत. यामध्ये १३१५४ अर्ज ऑफलाईन तर १९८८३ अर्ज आनलाईन जमा करण्यात आले. तसेच विधानसभा निहाय आंगणवाडी केंद्रांवर अर्ज १२१०२ ऑफलाईन तर ३०८९३ अर्ज ऑनलाईन असे एकूण ४२९९५ अर्ज जमा झाले आहेत. झोनमधील केंद्र आणि आंगणवाडी असे दोन्ही मिळुन ७६०३२ अर्ज जमा करण्यात आले आहेतअशी माहिती उपायुक्त डॉ. रंजना लाडे यांनी दिली.

रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कार्यवाहीला गतीआतापर्यंत बुजविले ९६८ खड्डे*

नागपूर:- पावसामुळे नागपूर शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्याच्या कार्यवाहीला गती देण्यात आली आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार हॉट मिक्स प्लाँट विभागाद्वारे खड्डे बुजविण्याच्या कामाला गती आलेली आहे. मागच्या दहा दिवसात मनपाच्या दहाही झोनमध्ये यंत्रेणेने ९६८ खड्डे (५६०२ चौ.मी.) बजुविले आहे. या कामात इंस्टा व जेट पॅचरचा सुध्दा वापर करण्यात  आला आहे.मनपा आयुक्तांच्या निर्देशानुसार हॉट मिक्स प्लाँट विभागाद्वारे रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी विशेष चमू देखील गठीत करण्यात आली आहे. शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या कामात सुसूत्रता यावी व वेळेत खड्डे बुजविले जावेत याकरिता 
प्रत्येक झोन स्तरावर समन्वयक नेमून त्यांची जबाबदारी निश्चित केली आहे. यासाठी साप्ताहिक वेळापत्रक निश्चित करण्यात आले असून पाच पाच झोनमध्ये खड्डे बुजविण्याची कार्यवाही सुरू आहे. २३ ते २५ जुलै २०२४ या कालावधीमध्ये मंगळवारीधंतोलीगांधीबागआशीनगर आणि लकडगंज या पाच झोनमधील खड्डे बुजविण्यात आले. तर २६२७ आणि २९ जुलै २०२४ या कालावधीत धरमपेठ सतरंजीपुरा नेहरूनगरलक्ष्मीनगर आणि हनुमान नगर झोनमधील खड्डे बुजविण्याबाबत कार्य सुरू झाले आहेत. सुरळीतपणे खड्डे बुजविण्याबाबत कार्यवाही व्हावी याकरिता प्रत्येक झोनमध्ये उपअभियंता यांना समन्वयक म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे.नागपूर शहरातील अंतर्गत रस्त्यांवर पावसामुळे आणि जड वाहतुकीमुळे मोठे खड्डे तयार झाले आहेत. दहाही झोन अंतर्गत वस्त्यांमधील रस्त्यांवरचे खड्डे बुजविण्यासाठी हॉट मिक्स प्लॉंट विभागाद्वाने मोहिम हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत आतापर्यंत एकूण ९६८ खड्डे बुजविण्यात आले आहेत. ही माहिती कार्यकारी अभियंता श्री. अजय डहाके यांनी दिली.

कारगिल विजय दिनी “अमर जवान” स्मारकाची स्वच्छता

 
नागपूर: भारतीय सैन्याच्या असीम शौर्याची आठवण जागृत ठेवणाऱ्या कारगिल विजय दिनानिमित्त नागपूर महानगरपालिकेच्या चमुद्वारे अमर जवान शहीद स्मारकाची व थोर हुतात्मा यांच्या पुतळयाला स्वच्छता करून समस्त हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.स्वच्छसुंदर आणि स्वस्थ नागपूर साकारण्यासह शहराच्या सौंदर्य करण्याच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिका विशेष कार्य करीत आहे. 25 व्या कारगिल विजय दिनानिमित्त नागपूर महानगरपालिकेच्यावतीने अमर जवान शहीद स्मारकासह शहरातील विविध ठिकाणी 
असणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या पुतळ्यांची देखील स्वच्छता करण्यात आली.मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात व अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांच्या नेतृत्वात आणि दहाही झोनचे सहायक आयुक्त यांच्या देखरेखीत शहरातील दहाही झोन मध्ये असणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या पुतळ्यांस्थानी श्रमदान करण्यात आले.  स्वच्छतेदरम्यान नागरिकांनी देखील श्रमदान करीत उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 39 प्रकरणांची नोंद उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर:- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर,  कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. शुक्रवार (26) रोजी शोध पथकाने 39 प्रकरणांची नोंद करून 48100 रुपयाचा दंड वसूल केला.  हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 14 प्रकरणांची नोंद करून 5600 रुपयांची वसुली करण्यात आली. कोणत्याही व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत 4 प्रकरणांची नोंद करून 400 रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 400 रुपयांची वसुली करण्यात आली. मॉलउपहारगृहेलॉजिंगबोर्डींग हॉटेलसिनेमा हॉलमंगल कार्यालयकॅटरर्स सर्व्हीस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 2000 रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 4 प्रकरणांची नोंद करून 5500 रुपयांची वसुली करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी जनावरे बांधणे या अंतर्गत 2 प्रकरणांची नोंद करून 2000 रुपयांची वसुली करण्यात आली. वैद्यकिय व्यवसायिकांना बायोमेडीकल वेस्ट सर्वसाधारण कचऱ्यात टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 25000 रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 6 प्रकरणांची नोंद करून 1200 दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 6 प्रकरणांची नोंद करून 6000 दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.तसेच उपद्रव शोध पथकाने मंगळवारी झोन अंतर्गत मे. कुणाल हॉस्पीटल यांच्या विरूध्द मनपा नियमांचे उल्लंघन केल्याबददल रू. 25,000/- चे दंड वसुल करण्यात आले. उपद्रव शोध पथकाने 1 प्रकरणांची नोंद करून रू. 25,000/- दंड वसूल केला.

Tuesday, July 23, 2024

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी मनपाची यंत्रणा सुसज्ज ठेवा *मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांचे निर्देश

नागपूर:- महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या दृष्टीने महत्वाच्या अशा मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेची माहिती सर्व महिलांपर्यंत पोहोचावी व या योजनेचा लाभ प्रत्येक पात्र महिलेला मिळावा याकरिता नागपूर महानगरपालिकेच्या दहाही झोनची संपूर्ण यंत्रणा सुसज्ज ठेवावीशासन-प्रशासनाद्वारे प्राप्त निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे असे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.मुख्यमंत्री– माझी लाडकी बहीण’ योजनेसंदर्भात मंगळवारी (ता:२३) मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. मनपा मुख्यालयातील आयुक्त सभाकक्षात झालेल्या बैठकीत अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयलउपायुक्त डॉ. रंजना लाडेउपायुक्त तथा सहायक आयुक्त सर्वश्री प्रकाश वराडेमिलिंद मेश्रामनरेंद्र बावनकरघनशाम पंधरे. गणेश राठोडहरीश राऊतप्रमोद वानखेडेअशोक घरोटेविजय थूलवैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकरअतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशीसाथरोग अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरेशिक्षणाधिकारी श्रीमती साधना सयामबालविकास प्रकल्प अधिकारी सर्वश्री. दामोधर कुंभरे,  नितीन मोहुर्लेश्रीमती भारती मानकरअपर्णा कोल्हेराष्ट्रीय 
नागरी उपजीविका अभियान शहर व्यवस्थापक श्री. प्रमोद खोब्रागडेश्रीमती नूतन मोरेअंगणवाडी पर्यवेक्षक(शहर) मनपाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते. बैठकीत मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी मनपाच्या दहाही झोन निहाय आणि प्रभाग निहाय यंत्रणा सुसज्ज ठेवण्याचे निर्देशित केले. सर्व सहायक आयुक्तांनी मनपाच्या दहाही झोन केंद्रप्रभाग निहाय केंद्रांवर ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज स्वीकारण्याच्या व्यवस्थेचे योग्य नियोजन करावेसर्व केंद्रावर ऑफलाईन प्राप्त होत असलेल्या अर्जांना ऑनलाईन करण्यासाठी लागणारे पुरेसे व अतिरिक्त मनुष्यबळ नेमावेप्राप्त अर्जाची योग्य छाननी करण्यासाठी छाननी समितीमान्यता समिती स्थापन करून  शासन-प्रशासनाद्वारे प्राप्त निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावेअपात्र अर्जांच्या हरकती मागविण्यासाठी ३ दिवसांकरिता यादी झोन स्तरावर ऑनलाईन स्वरुपात प्रसिद्ध करण्यात यावी,  योजनेचा व्यापक प्रचार - प्रसार व प्रत्यक्ष लाभ याविषयीची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावीअर्ज ऑनलाईन स्वरुपात भरण्यासाठी प्रासंगिक आशा सेविकांची मदत घावी असे देखील आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी सूचित केले.

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 36 प्रकरणांची नोंद उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर:- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर,  कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. मगंळवार (23) रोजी शोध पथकाने 36 प्रकरणांची नोंद करून 29400 रुपयाचा दंड वसूल केला. सार्वजनिक ठिकाणी रस्ता फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी/ उघडयावर मलमुत्र विर्सजन करणे (रु. 500/- दंड) या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 500 रुपयांची वसुली करण्यात आली.  हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 5 प्रकरणांची नोंद करून 2000 रुपयांची वसुली करण्यात आली. कोणत्याही व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 100 रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 3 प्रकरणांची नोंद करून 1200 रुपयांची वसुली करण्यात आली. मॉलउपहारगृहेलॉजिंगबोर्डींग हॉटेलसिनेमा 
हॉलमंगल कार्यालयकॅटरर्स सर्व्हीस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता या अंतर्गत 2 प्रकरणांची नोंद करून 4000 रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 8 प्रकरणांची नोंद करून 16000 रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 13 प्रकरणांची नोंद करून 2600 दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 3 प्रकरणांची नोंद करून 3000 दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मी नगर झोन अंतर्गत मे. ओम ऑटो स्टेशन यांच्या विरूध्द मनपा नियमांचे उल्लंघन केल्याबददल रू. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आले. धरमपेठ झोन मे. राधे संदेश बिल्डर्स यांच्या कडून सुध्दा रू. 10,000/- दंड वसूल करण्यात आले. हनुमान नगर झोन अंतर्गत मे. करण बिल्डर्स व मे. ओरीयंट ग्रुप यांच्या रू. 15,000/- दंड वसूल करण्यात आले. धंतोली झोन अंतर्गत मे. गिरडे कंट्रक्शन यांच्या कडून यांच्या रू. 10,000/- दंड वसूल करण्यात आले. सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे. सुपर सोनपापडी यांच्यावर प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. 5,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. उपद्रव शोध पथकाने 6 प्रकरणांची नोंद करून रू. 45,000/- दंड वसूल केला.

लोकमान्य टिळक व चंद्रशेखर आझाद जयंतीनिमित्त मनपातर्फे अभिवादन

 
नागपूर:- स्वराज्य हा माझा जन्मसिध्द अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच! अशी सिंहगर्जना करणारे भारतीय स्वातंत्र्यलढयाचे थोर स्वातंत्र्यसेनानी, राष्ट्रभक्त लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि भारतीय स्वातंत्र्यलढयातील थोर क्रांतीकारक चंद्रशेखर आझाद यांच्या जयंती निमित्त नागपूर महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.याप्रसंगी अति. आयुक्त आंचल गोयल, जनसंपर्क अधिकरी मनिष सोनी, अमोल तपासे, राजेश गजभिये, गजानन जाधव, राजेश लोहितकर, विनोद डोंगरे, प्रकाश खानझोडे, संजय भिसे, किर्ती खापेकर, संगिता गायकवाड, किरण उराडे उपस्थित होते.

गुरु पूर्णिमा कार्यक्रम संपन्न लायंस क्लब नागपुर आयुर्वेद द्वारा श्री महालक्ष्मी जगदंबा मंदिर कोराडी में

नागपूर:- दिनांक 21 जुलाई 2024 को शाम 5:30 बजे गुरुपूर्णिमा के पर्व पर श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान, कोराडी  मंदिर के हाल में, लायंस क्लब नागपुर आयुर्वेद द्वारा गुरु पूर्णिमा का पर्व मनाया गया। इस कार्यक्रम मे लायंस क्लब नागपुर आयुर्वेद की अध्यक्ष डॉ.मृणालिनी थटेरे ने सभी का स्वागत किया तथा इस गुरु पूर्णिमा कार्यक्रम की संकल्पना एवं पार्श्वभूमी के बारे में विस्तृत जानकारी दी। गुरु पूर्णिमा के अवसर पर श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान, कोराडी मंदिर के पुजारीयो का सत्कार किया गया। इनमे श्री केशव महाराज
श्री अशोक महाराज, श्री राजु महाराज, श्री गुप्ताजी, श्री बाबूलाल परिहार, श्री शोभेलालजी तथा श्री दिलीप बांगरे का सत्कार किया गया साथ ही आयुर्वेद के गुरु डॉ. वेद प्रकाश शर्मा, डॉ. गिरजा शंकर ज्योतिषी इनका गुरु पूर्णिमा के पर्व पर लायंस क्लब नागपुर आयुर्वेद के द्वारा सत्कार किया गया। लायंस क्लब नागपुर आयुर्वेद के सीनियर सदस्य डॉ.किरण तिवारी, डॉ.सुरेश खानोरकर, डॉ.मंगेश भलमे, डॉ. 
संजय थटेरे का सत्कार किया गया। लायंस क्लब नागपुर आयुर्वेद द्वारा क्लब के सदस्यों के माता-पिता का भी इस अवसर पर सत्कार किया गया। इनमे श्रीमती मालिनी शिवनकर, श्रीमती ममता नवलकर, श्री दशरू मरकाम, श्रीमती कांतीबाई मरकाम, डॉ. रमेश बारस्कर आदि का सत्कार किया गया। इस अवसर पर आचार्य डॉ. वेद प्रकाश शर्मा, डॉ.श्रीराम ज्योतिष सर ने गुरु पूर्णिमा पर्व पर अपने विचार व्यक्त किए। कार्यक्रम के प्रमुख अतिथि के पास्ट डिस्ट्रिक्ट गवर्नर एम.जे.एफ.राजेंद्र मिश्रा, रीजन चेयरपर्सन एम.जे.एफ.डॉ.पार्वती 
राणे,ज़ोन चेयरपर्सन एम.जे.एफ.धनंजय ठोंबरे ने गुरु पूर्णिमा पर्व पर अपने विचार व्यक्त किए। कार्यक्रम का मंच संचालन डॉ.संजय थटेरे ने किया। कार्यक्रम का आभार प्रदर्शन सचिव डॉ.प्रशांत गनोरकर ने किया। इस अवसर पर लायंस क्लब नागपुर आयुर्वेद की ओर श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान, कोराडी के परिसरमे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न हुआ एवं मंदिर की महिला कर्मचारियों को साड़ियों का वितरण किया गया। इस कार्यक्रम में बड़ी संख्या में लायंस क्लब नागपुर आयुर्वेद के सदस्य, पदाधिकारी उपस्थित थे। इस कार्यक्रम को सफल बनाने के लिए लायंस क्लब नागपुर आयुर्वेद के सभी पदाधिकारी का  सहयोग रहा।  उपरोक्त जानकारी गुरु पूर्णिमा कार्यक्रम के प्रकल्प अधिकारी डॉ.संजय थटेरे ने पत्रकारों को दी।


पंतप्रधान आर्य चाणक्य कौशल्य विकास योजना आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्ट अप योजनेचा करणार आरंभ

नवी दिल्ली:- पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील वर्ध्याला भेट देणार आहेत. सकाळी साडेअकराच्या सुमारास ते पीएम विश्वकर्मा ...