Friday, July 19, 2024

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 59 प्रकरणांची नोंद उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर:- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. शुक्रवार (19) रोजी शोध पथकाने 59 प्रकरणांची नोंद करून 25500 रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 14 प्रकरणांची नोंद करून 5600 रुपयांची वसुली करण्यात आली. कोणत्याही व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत 7 प्रकरणांची नोंद करून 700 रुपयांची वसुली करण्यात आली. 

दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 3 प्रकरणांची नोंद करून 1200 रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतुकीचा रस्ता मंडपकमानस्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तीक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत प्रकरणांची नोंद करून 9000 रुपयांची वसुली करण्यात आलीउपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 25 प्रकरणांची नोंद करून 5000 दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास प्रकरणांची नोंद करून 4000 दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.तसेच उपद्रव शोध पथकाने धरमपेठ झोन येथील निव से की तक ढाबा यांच्या विरूध्द मनपा नियमांचे उल्लंघन केल्याबददल रू. 10,000/- चे दंड वसूल केले. लव कुश पान,खरे टॉऊन कडून सुध्दा रू. 5000/-, हनुमान नगर झोन अंतर्गत साईविला रेसीडेंसीमानेवाडा रू. 10,000/- दंड वसूल केला. धंतोली झोन अंतर्गत दि राईस गणेशपेठ कडून रू. 10,000/- दंड वसुल करण्यात आला. उपद्रव शोध पथकाने 5 प्रकरणांची नोंद करून रू. 40,000/- दंड वसूल केला.

No comments:

Post a Comment

पंतप्रधान आर्य चाणक्य कौशल्य विकास योजना आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्ट अप योजनेचा करणार आरंभ

नवी दिल्ली:- पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील वर्ध्याला भेट देणार आहेत. सकाळी साडेअकराच्या सुमारास ते पीएम विश्वकर्मा ...