Wednesday, July 3, 2024

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 73 प्रकरणांची नोंद- उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर:नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवरकचरा फेकणाऱ्यांवरथुंकणाऱ्यांवर५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईची सुरुवात केली आहेबुधवारी (ता03रोजी उपद्रव शोध पथकाने 73 प्रकरणांची नोंद करून 41 हजार 500 रुपयाचा दंड वसूल केला.शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावरफुटपाथवर कचरा टाकणारेथुंकणारेघाण करणारेलघुशंका करणारेप्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु आहे. हाथगाडयास्टॉल्सपानठेलेफेरीवालेछोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता
(रु४००दंडया अंतर्गत  16 प्रकरणांची नोंद करून 6 हजार 400 रुपयांचा दंड वसुल  करण्यात
 आला.व्यक्तीने रस्ता,फुटपाथ,मोकळी  जागा
 अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 7 प्रकरणांची नोंद करून 700 रुपयांचा दंड वसुल करण्यातआला.दुकानदाराने रस्ताफुटपाथ मोकळी जागा अशा  ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 02 प्रकरणांची  नोंद करून 800 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.मॉल उपहारगृहलॉजिंग, बोर्डिंगचे होर्डिंग, सिनेमाहॉल
मंगल कार्यालयेकॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ताफुटपाथमोकळी जागाअशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 01 प्रकरणाची नोंद करून 2 हजार रुपयांचादंड वसुल करण्यात आलावाहतुकीचा रस्ता मंडपकमानस्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 07 प्रकरणांची नोंद करून 14 हजार 800 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. वर्कशॉप, गॅरजेस व इतर दुरुस्तीचे व्यवसायीकांने रस्ता, फुटपाथ मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत  03 प्रकरणांची नोंद करुन हजार रुपयाचा दंड वसुल करण्यात आला. सार्वजनिक रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी बांधकामाचा मलबा/टाकावू कचरा टाकणे/ साठवणे, प्रथम 48 तासात हटविण्याची नोटीस देऊन न हटविल्यास या अंतर्गत 01  प्रकरणाची नोंद करुन हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. उपरोक्त  यादीत  आढळणारे इतर  उपद्रव (व्यक्ती)  असल्यास
 29 प्रकरणांची नोंद करून हजार  800 रुपये दंड वसूल करण्यात  आलेला आहेउपरोक्त यादीत   आढळणारे  इतर  उपद्रव (संस्था)
 असल्यास 07 प्रकरणांची नोंद करून 7 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.*प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवी बाळगणाऱ्या 04 प्रकरणांची नोंद*मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे बुधवारी (ता03रोजी प्रतिबंधित प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या धंतोली झोन अंतर्गत रिषभ धवले कॉटन मार्केट, गांधीबाग झोन अंतर्गत केशव किराणा सब्जी मंडी ईतवारी, सतरंजीपुरा झोन अंतर्गत पौनीकर किराणा शॉप मस्कासाथ ईतवारी आणि आशीनगर झोन अंतर्गत रवी स्वीट्स कपिल नगर या चार प्रतिष्ठानांकडून एकुण 20 हजार  रुपये दंड वसूल करण्यात आला
याशिवाय धरमपेठ झोन अंतर्गत कोलकाता रोल रेस्टारेंट शंकर नगर हाटेलचा कचरा टाकुण चेंबर ब्लाक केल्याबा बतयांच्या कडून
5 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. कला किड्स फेन्ड्रस कॉलोनी काटोल रोड आणि आशीनगर झोन अंतर्गत लीटील अर्चीवर स्कुल

आवळे बाबु चौक परवानगी न घेता बॅनर आणि होर्डिग लावल्यास या दोन प्रतिष्ठानांकडून एकूण 10 हजार रुपये  दंड वसूल  करण्यात आला. हनुमान नगर झोन अंतर्गत स्वाप्निल मेंढे रेशिमबाग सक्करदरा, धंतोली झोन अंतर्गत अपॅक्स बिल्डकॉन मनीष नगर आणि मंगळवारी झोन अंतर्गत साईबा एन्क्लेव राजाराम सोसायटी झिंगाबाई टाकळी रस्त्यालगत बांधकामाचा कचरा टाकण्याबाबत या तीन प्रतिष्ठानांकडुन एकुण 30 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. असे एकूण 10 प्रकरणांची नोंद करून 65 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.

No comments:

Post a Comment

पंतप्रधान आर्य चाणक्य कौशल्य विकास योजना आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्ट अप योजनेचा करणार आरंभ

नवी दिल्ली:- पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील वर्ध्याला भेट देणार आहेत. सकाळी साडेअकराच्या सुमारास ते पीएम विश्वकर्मा ...