Friday, July 19, 2024

बांधकाम आणि पाडाव कचऱ्यावर पुनर्वापर प्रक्रिया सुरू मनपा आयुक्तांनी केली प्रकल्पाची पाहणी

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेद्वारे हैद्राबाद सी अँड डी वेस्ट प्रा. कंपनीच्या माध्यमातून भांडेवाडी डम्पिंग यार्ड परिसरात उभारण्यात आलेले बांधकाम आणि पाडाव (Construction and Demolition) कचऱ्यावर पुनर्वापर प्रक्रिया केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राला गुरूवारी (ता.१८) सायंकाळी भेट देऊन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी पाहणी केली.याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल, उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले, अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, सहायक आयुक्त श्री. घनश्याम पंधरे, उपअभियंता राजेश दुफारे, कार्यकारी अभियंता श्री. नरेश सिंगनजुडे, मनपाचे सल्लागार श्री. राजेंद्र जगताप, कनिष्ठ अभियंता प्रशांत वाघमारे उपस्थित होते. हैद्राबाद सी अँड डी वेस्ट प्रा. कंपनीचे महाव्यवस्थापक मो. नसरुल्ला, प्रकल्प प्रमुख श्री. 
अभिषेक पांडे, झिग्माचे श्री. शंकर रामन आणि सस्टेनेबल बिझनेस डेव्हलपमेंटचे श्री. दिपक पाटील व श्री. रोहित जांभुळकर यांनी प्रकल्पस्थळी प्रक्रियेबाबत माहिती स्पष्ट केली.नागपूर शहरात दररोज निर्माण होणारा बांधकाम आणि पाडाव (Construction and Demolition) कचरा कमी व्हावा आणि या कचऱ्यावर पुनर्वापर प्रक्रिया करून प्रक्रिया झालेले मटेरियल बांधकामासाठी पुन्हा वापरता यावे या हेतूने मनपा आणि हैद्राबाद सी अँड डी वेस्ट प्रा. कंपनीमध्ये करार करण्यात आला आहे. मनपातर्फे कंपनीला भांडेवाडी येथे ५ एकर जमीन देण्यात आलेली आहे. कंपनीद्वारे भांडेवाडी डम्पिंग यार्ड परिसरात बांधकाम आणि पाडाव

(Construction and Demolition) कचऱ्यावर पुनर्वापर प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. या प्रक्रिया केंद्रात बांधकाम आणि पाडाव कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. यातून वेगवेगळ्या आकारामध्ये गिट्टी वेगळी केली जाते याशिवाय उत्तम दर्जाची रेती देखील वेगळी करण्यात येत आहे. या प्रकल्पातून निर्माण मटेरियलचा वापर करून आयब्लॉकची देखील निर्मिती प्रकल्पस्थळी केली जात आहे. या संपूर्ण प्रकल्पाची मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी पाहणी केली. शहरात कुठेही बांधकाम आणि पाडाव (सी अँड डी) कचरा जमा राहू नये यासाठी वाहनांची संख्या वाढविणे व नागरिकांना सहज संपर्क साधता येईल अशी यंत्रणा निर्माण करण्याबाबत आयुक्तांनी यावेळी निर्देश

दिले.आयुक्तांनी झिग्मा ग्लोबल एन्व्हायरो सोल्यूशन आणि सस्टेनेबल बिझनेस डेव्हलपमेंट (SusBDe) कंपनीद्वारे ओला आणि सुका कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येत असलेल्या केंद्रांना देखील भेट देऊन पाहणी केल व प्रकल्पांची विस्तृत माहिती जाणून घेतली.सस्टेनेबल बिझनेस डेव्हलपमेंट (SusBDe) कंपनीद्वारे भांडेवाडी डम्पिंग यार्ड परिसरात ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया केली जात आहे. या प्रकल्पामध्ये शहरातील काही झोनमधून संकलीत कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून कम्पोस्ट निर्मिती व त्याचे पॅकेजिंग केले जात आहे. कचऱ्यामध्ये पाणी राहून त्यातून दुर्गंध येउ नये याकरिता डम्पिंग यार्ड परिसरात कचरा आणताना संबंधित झोनमधील ट्रान्सफर स्टेशनवरील कॉम्पॅक्टरमध्ये कॉम्पॅक्टकरूनच कचरा आणला जावा. तसेच प्रकल्पस्थळी समतलपणा असावा, कुठेही पाणी जमा राहणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश यावेळी आयुक्त डॉ. चौधरी यांनी दिले.
 शहरातील जुन्या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी नागपूर महानगरपालिकेद्वारे भांडेवाडी डम्पिंग यार्ड येथे बायोमायनिंग प्रकल्प उभारण्यात आले आहे. या प्रकल्पाचे कार्य झिग्मा ग्लोबल एन्व्हायरो सोल्यूशन कंपनीद्वारे सुरू आहे. या कंपनीच्या कामाची देखील माहिती यावेळी आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी जाणून घेतली. सी अँड डीवेस्ट प्रकल्पाकडे जाणारा मार्ग तसेच ओला आणि सुका कचरा प्रक्रिया केंद्र येथे सिमेंट रोडची निर्मिती करण्याच्या कार्यवाहीला गती देण्याचे निर्देशही मनपा आयुक्त डॉ. चौधरी यांनी संबंधित कार्यकारी अभियंत्यांना दिले. 

No comments:

Post a Comment

पंतप्रधान आर्य चाणक्य कौशल्य विकास योजना आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्ट अप योजनेचा करणार आरंभ

नवी दिल्ली:- पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील वर्ध्याला भेट देणार आहेत. सकाळी साडेअकराच्या सुमारास ते पीएम विश्वकर्मा ...