Wednesday, July 3, 2024

नियमित लसीकरणाबाबत टास्क फोर्स समितीची बैठक

नागपूर:-नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील मनपा रुग्णालयशासकीय व खासगी दवाखान्यांमध्ये होणाऱ्या नियमित लसीकरण संदर्भात अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (ता.०३ )  टास्क फोर्स समितीची बैठक पार पडली.मनपा मुख्यालयातील अतिरिक्त आयुक्त सभाकक्षात झालेल्या बैठकीत मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकरअतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवारप्रजनन व बालकल्याण अधिकारी डॉ. सरला लाड, जागतिक आरोग्य संघटनेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहम्मद साजीदसाथरोग अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरेझोनल वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपांकर भिवगडेडॉ. सुनील कांबळेडॉ. जयश्री चन्नेडॉ. गजानन वानेडॉ. अतीक खानडॉ. ख्वाजा मोईनुद्दीनडॉ. विजयकुमार तिवारीडॉ सूलभा शेंडे, डॉ देवस्थळे, डॉ मालखंडालेश्रीमती दीपाली नागरेश्रीमती दीपाली पवार शिक्षण विभागाचे श्री. 
संजय दिघोरे यांच्यासह/CDPOS बालविकास प्रकल्प अधिकारी, Lions Club चे प्रतिनिधी  लसीकरण क्षेत्र सनियंत्रकआशा सेविका व इतर प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होत.बैठकीत अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी नियमित लसीकरणाचा आढावा घेतला. ज्या भागांमध्ये लसीकरणाचे प्रमाण कमी असेल अशा ठिकाणी नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत जनजागृती निर्माण करावीगरजेनुसार नागरिकांचे समुपदेशन करावेलसीकरण वाढविण्यासाठी संबंधित अधिकारीझोनल अधिकाऱ्यांनी युपीएचसी स्तरावर अंगणवाडी कर्मचारीआशा एएनएम आदी कर्मचाऱ्यांचे योग्य मार्गदर्शन करावेवरिष्ठ अधिकाऱ्यांनी आशा व एएनएम यांच्या नोंदवहीची नियमित तपासणी करावी. असे निर्देश श्रीमती गोयल यांनी बैठकीत दिले. 

याशिवाय बालकांच्या लसीकरणासाठी महिला आरोग्य समितीच्या सदस्यांचा सहभाग वाढवा याकरिता नियमित बैठक घेण्यात यावीअसेही निर्देशही श्रीमती गोयल यांनी दिले. शिवाय वैद्यकीय अधिकारी व झोनल वैद्यकीय अधिकारी यांनी लसीकरण सत्रास भेटी द्याव्या व हेड काऊंट सर्व्हे  तपासण्याच्या सुचना श्रीमती आंचल गोयल यांनी दिल्या.तसेच बैठकीत वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी  अतिदक्षता परिसरात 'हाय रिस्क एरियामध्ये जाऊन लसीकरणाविषयी जनजागृती करावीबांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी देखील प्रत्यक्ष जाऊन लसीकरण मोहीम राबवावी. मोबाईल लसीकरण व्हॅनद्वारे लसीकरणाला गती आणावी आणि बालकांचे वेळेत लसीकरण होईल याची काळजी घ्यावी. अशा सूचना दिल्या.बैठकीत सर्वप्रथम प्रजनन व बालकल्याण अधिकारी डॉ. सरला लाड यांनी गत महिन्यात लसीकरणापासून वंचित व उशिरा झालेल्या लसीकरणाबाबत माहिती दिली. तर जागतिक आरोग्य संघटनेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहम्मद साजीद यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे नियमित लसीकरणाची माहिती दिली.

No comments:

Post a Comment

पंतप्रधान आर्य चाणक्य कौशल्य विकास योजना आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्ट अप योजनेचा करणार आरंभ

नवी दिल्ली:- पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील वर्ध्याला भेट देणार आहेत. सकाळी साडेअकराच्या सुमारास ते पीएम विश्वकर्मा ...