Thursday, June 20, 2024

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 62 प्रकरणांची नोंद- उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

 नागपूर:नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवरकचरा 
फेकणाऱ्यांवरथुंकणाऱ्यांवर५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईची सुरुवात केली आहेगुरुवारी (ता20रोजी उपद्रव शोध पथकाने 62 प्रकरणांची नोंद करून 36 हजार 800 रुपयाचा दंड वसूल केला.शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावरफुटपाथवर कचरा टाकणारेथुंकणारेघाण करणारेलघुशंका करणारेप्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु आहेसार्वजनिक ठिकाणी, रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी थुंकणे या अंतर्गत प्रकरणांची नोंद करुन 600  रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. हाथगाडयास्टॉल्सपानठेलेफेरीवालेछोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या  परिसरात अस्वच्छता (रु४००/- दंडया अंतर्गत 20 प्रकरणांची नोंद करून 8 हजार रुपयांचा दंड वसुल

करण्यातआलाव्यक्तीने रस्ताफुटपाथमोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 04 प्रकरणांची नोंद करून 400 रुपयांचा दंडवसुल करण्यात आलादुकानदाराने रस्ताफुटपाथमोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे याअंतर्गत 07 प्रकरणांची नोंद करून हजार 800 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.वाहतुकीचा रस्ता मंडपकमानस्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 3 प्रकरणांची नोंद करून 16 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. उपरोक्त यादीत  आढळणारे इतर उपद्रव (व्यक्ती)  असल्यास 20 प्रकरणांची  नोंद करून हजाररुपये दंड वसूल करण्यात आलेला आहेउपरोक्त यादीत  आढळणारे इतर उपद्रव (संस्था) असल्यास 5 प्रकरणांची नोंद करून 5 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.*प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवी बाळगणाऱ्या 02 प्रकरणांची नोंद*मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे गुरूवारी (ता20रोजी प्रतिबंधित प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या गांधीबाग झोन अंतर्गत शाहु स्वीट मार्ट गरोबा मैदान चौक आणि सतरंजीपुरा झोन अंतर्गत आसिफ किराणा शॉप राम सुमेर बाबा नगर या दोन प्रतिष्ठानांकडुन एकुण 10 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. याशिवाय धरमपेठ झोन अंतर्गत अल्ट्राटेक प्रा. लि. तिरपुडे कॉलेज जवळ रस्त्यालगत बांधकामाचा कचरा टाकण्याबाबत यांच्याकडुन 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. 
धरमपेठ झोन अंतर्गत सी प्रिंस कन्ट्रशन्स प्रकाश नगर ढाबा, हनुमान नगर झोन अंतर्गत आनंद एन्केव्ह रेशिमबाग आणि सतरंजीपुरा झोन अंतर्गत निखारे बिल्डर्स सोनरटोली बिनाकी बांधकामाचा कचरा रस्त्‍यालगत टाकल्याबाबत या तीन  प्रतिष्ठानांकडुन एकुण 30 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. धंतोली झोन अंतर्गत कालोडे महाविद्यालय ओमकार नगर परवानगी न घेता बॅनर आणि होर्डिग लावल्यास या चार प्रतिष्ठांनाकडुन एकुण 5 हजार रुपयाचा दंड वसुल करण्यात आला. लकडगंज झोन अंतर्गत नरेश गुप्ता सुर्या नगर रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात माती टाकण्याबाबत यांच्याकडुन 5 हजार रुपयाचा दंड वसुल करण्यात आला. असे एकूण प्रकरणांची नोंद करून 60 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.

No comments:

Post a Comment

पंतप्रधान आर्य चाणक्य कौशल्य विकास योजना आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्ट अप योजनेचा करणार आरंभ

नवी दिल्ली:- पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील वर्ध्याला भेट देणार आहेत. सकाळी साडेअकराच्या सुमारास ते पीएम विश्वकर्मा ...