Wednesday, June 26, 2024

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त म.न.पा.तर्फे अभिवादन

 नागपूर:- सामाजिक परिवर्तनाचे स्वप्न उराशी बाळगून ज्यांनी शिक्षणाचा लाभ तळागाळातील सर्व लोकांना मिळावा यासाठी प्रयत्न केले. अस्पृश्यता व जातिभेद निर्मुलनस्त्री शिक्षण इ.विविध उपक्रम राबवून सामाजिक सुधारणा घडवून आणल्याअसे थोर समाजसुधारक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 150 वी जयंती निमित्त नागपूर महानगरपालिकेच्या केन्द्रीय कार्यालयातील मुख्य अभियंता श्री. राजीव गायकवाड यांनी राजर्षी शाहु महाराज यांच्या तैलचित्राला माल्यार्पण करुन विनम्र अभिवादन केले. यावेळी सहा. आयुक्त श्री. श्याम कापसेसहा. अधिक्षक श्री. राजकुमार मेश्राम, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनीकनिष्ठ अभियंता सुनिल नवघरेराजेश गजभियेअमोल तपासेसमीर परमार, विनोद डोंगरे, शैलेश जांभुळकरनरेंद्र रामटेके, वर्षा खडके, योगीता चर्जे, मेध्यार्थी पानतावणे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

अंबाझरी, फुटाळा व गोरेवाडा तलावांवर सुरक्षेच्या उपाययोजना नागरिकांनी सुरक्षेच्या सूचनांचे पालन करावे

नागपूर - शहरातील अंबाझरी ,  फुटाळा व गोरेवाडा तलाव ओव्हर फ्लो होण्याची शक्यता लक्षात    घेऊन नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने तसेच...