Wednesday, June 26, 2024

तीनही नद्यांच्या पात्रातून एकूण १ लाख ३१ हजार ४२९.१७ क्यूबिक मीटर गाळ काढण्यात आला….

नागपूर : पावसाळ्यापूर्वी शहरातील प्रमुख तीनही नद्यांच्या स्वच्छतेचे लक्ष्य पूर्ण झालेले आहेशहरातील नाग नदीपिवळी नदी आणि पोहरा नदीच्या स्वच्छतेचे कार्य पूर्ण करण्यात आलेले आहेतमनपा आयुक्त तथा प्रशासक डॉअभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात हे नदी स्वच्छता अभियान पूर्णत्वास आले आहे. नागपूर शहरातून वाहणा-या  नाग नदीपिवळी  नदी आणि पोहरा नदी  या तिनही नद्यांच्या  स्वच्छतेचे कार्य मनपा आयुक्तांच्या मार्गदर्शनात फेब्रुवारी महिन्यात सुरू करण्यात आले होतेनदी स्वच्छता अभियानाद्वारे तीनही नद्यांच्या 
पात्रातून एकूण  लाख ३१ हजार ४२९.१७ क्यूबिक मीटर गाळ काढण्यात आला आहेनाग नदीची लांबी १६.५८ किमीपिवळी नदीची लांबी १७.४२ आणि पोहरा नदीची लांबी १५.१७ किमी आहेनाग नदीची संपूर्ण स्वच्छता करण्यात आलीस्वच्छते दरम्यान ६४८९६.०५  क्यूबिक मीटर गाळ काढण्यात आलाया नदीतून ३१६३० क्यूबिक मीटर गाळ काढण्यात आलापोहरा नदीच्या स्वच्छतेचे देखील कार्य पूर्ण झालेया स्वच्छतेतून ३४९०३.१२ क्यूबिक मीटर गाळ काढण्यात आलाअशी माहिती अधीक्षक अभियंता श्रीमनोज तालेवार यांनी दिली आहे.पावसाळ्यामध्ये कोणत्याही प्रकारे नदीच्या प्रवाहाला अडथळा होऊ नये  सुरळीतरित्या पाणी वाहून जावे यादृष्टीने यावर्षी वर्षाच्या सुरुवातीलाच नदी स्वच्छता अभियान हाती घेण्यात आले होतेअभियानाच्या अनुषंगाने आयुक्त तथा प्रशासक डॉअभिजीत चौधरी यांच्याद्वारे वेळोवेळी आढावा देखील घेण्यात आलास्वतआयुक्तांनी अनेक ठिकाणी भेट देउन नदी स्वच्छतेच्या कार्याची पाहणी केलीयेणाया अडचणी जाणून घेतल्या  त्या सोडविण्याच्या दृष्टीने कार्यवाही देखील केलीआवश्यक त्या ठिकाणी सूचना करून त्यादृष्टीने काम करून घेतलेविभागातील समन्वय आणि आयुक्तांकडून वेळोवेळी घेण्यात येत असलेल्या आढाव्यामुळे पावसाळ्यापुर्वीच तीनही नद्यांची स्वच्छता पूर्ण झालेली आहे.
 

No comments:

Post a Comment

पंतप्रधान आर्य चाणक्य कौशल्य विकास योजना आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्ट अप योजनेचा करणार आरंभ

नवी दिल्ली:- पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील वर्ध्याला भेट देणार आहेत. सकाळी साडेअकराच्या सुमारास ते पीएम विश्वकर्मा ...