Thursday, June 27, 2024

पारडी नाका येथील प्रस्तावित बाजारपेठेची आयुक्तांनी केली पाहणी

नागपूर:-नागपूर महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी गुरुवारी (२७ जून) पारडी नाका येथील प्रस्तावित प्रकल्पाच्या जागेची पाहणी केली. आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी प्रस्तावित भाजीपाला आणि मटण मार्केट” प्रकल्पासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व मनपाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडुन प्रस्तावित प्रकल्पासंबंधी सविस्तर आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले.नागपूर-रायपूर महामार्गवरील मौजा भांडेवाडी येथील मार्केटसाठी आरक्षित असलेली ११,८८३ चौ.मी जागेवरील ५२ भूखंडाचा ताबा ललिता डेव्हलपर्स तर्फे २०१८ मध्ये घेण्यात आला असूनजागेवर अत्याधुनिक मार्केट विकसित 
करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची नियुक्ती करण्यात आली आहे. काही कारणास्तव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे मार्केटचे बांधकाम करण्यात आले नाही. आता या जागेवर मनापाद्वारे मार्केट विकसित करण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहे. मंजुर आराख्‌डया प्रमाणे विकसीत करावयाचे अत्याधुनिक मार्केट करीता आवश्यक जागापैकी मनपाचे नावे असलेली जागा व्यतिरिक्त  राज्य शासनाच्या मालकीची जागा प्राप्त करण्याकरीता कार्यवाही पुर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. सध्या इथे मांस विक्री करण्यात येत आहे. पाहणी दरम्यान आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधला यावेळी त्यांनी परिसरात अत्याधुनिक बाजारपेठ निर्माण करण्यात येणार असूनलवकरच विविध विभागांशीं चर्चा करून संबंधित त्रुटी दूर करण्याचे आश्वासित केले. 
पारडी नाका येथील आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या पाहणी दरम्यान मनपाचे मुख्य अभियंता श्री. राजीव गायकवाडअधीक्षक अभियंता श्री. मनोज तालेवारउपायुक्त श्री. मिलिंद मेश्रामनगर रचना विभागाचे उपसंचालक श्री. प्रमोद गावंडेसहायक आयुक्त श्री. विजय थूलकार्यकारी अभियंता श्री. नरेश बोरकरश्री. संजय माटेश्री. राजीव गौतमश्री. पंकज पराशर आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

पंतप्रधान आर्य चाणक्य कौशल्य विकास योजना आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्ट अप योजनेचा करणार आरंभ

नवी दिल्ली:- पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील वर्ध्याला भेट देणार आहेत. सकाळी साडेअकराच्या सुमारास ते पीएम विश्वकर्मा ...