Saturday, June 29, 2024

नागपूरच्या राष्ट्रीय प्रतिदर्श सर्वेक्षण कार्यालय- एनएसएसओच्या वतीने राष्ट्रीय सांख्यिकी दिवस साजरा

नागपूर:- केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम कार्यान्वयन मंत्रालयाच्या अंतर्गत  नागपूरच्या सेमिनरी हिल्स स्थित राष्ट्रीय प्रतिदर्श सर्वेक्षण कार्यालयएनएसएसओच्या वतीने  राष्ट्रीय सांख्यिकी दिवसानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून  हिस्लॉप  महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागाचे विभाग प्रमुख  डॉ. हरिओम पुनयानी यांनी सांगितले की कोणत्याही निर्णय घेण्यापूर्वी माहितीचे संकलन करणे आवश्यक असते . 'डेटा ड्रिव्हन डिसिजन मेकिंगहे कुठल्याही व्यवसायाच्या यशस्वी संचालनाकरिता महत्त्वपूर्ण  आहेअसेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले.याप्रसंगी एनएसएसओ नागपूर कार्यालयाचे संचालक एलएमजडेजा यांनी 
तरुण पिढीने सांख्यिकी क्षेत्रात करिअर करणे महत्त्वाचे असल्याचे सांगून  नरेगापेंशन शिष्यवृत्ती  यासाठी माहिती विश्लेषण महत्वाचे असून ही माहिती धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी वापरली जाते असे नमुद केले.सांख्यिकी शास्त्रज्ञ प्रा.प्रशांत चंद्र महालनोबीस यांच्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांचा जन्मदिन '२९ जूनदरवर्षी 'राष्ट्रीय सांख्यिकी दिनम्हणून साजरा करण्यात येतो.  यावर्षीच्या  सांख्यिकी दिवसाची संकल्पना " "निर्णय क्षमतेमध्ये माहितीचा वापर वापर अशी आहे.या प्रसंगी प्रश्नमंजुषा स्पर्धा आणि क्रॉसवर्ड पझल स्पर्धा देखील आयोजित आली. या कार्यक्रमाला सांख्यिकी विभागातील अधिकारी कर्मचारी. सांख्यिकीशास्त्राचे विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

भारत की राष्ट्रपति श्रीमती द्रौपदी मुर्मु का गणतन्त्र दिवस पर राष्ट्र के नाम संबोधन

मेरे प्यारे देशवासियो , नमस्कार! देश और विदेश में रहने वाले , हम भारत के लोग , उत्साह के साथ , गणतन्त्र दिवस का उत्सव मनाने जा रहे हैं। मै...