Thursday, June 6, 2024

आयुक्तांनी केली नाईक तलावाच्या कामाची पाहणी

 नागपूरनागपूर महानगरपालिकेद्वारे लालगंज बांगलादेश येथील नाईक तलावाच्या पुनरुज्जीवनाचे कार्य सुरू असून या कामाची बुधवारी (ता.मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉअभिजीत चौधरी यांनी पाहणी केलीतलावाच्या पुनरुज्जीवनाशी संबंधित आवश्यक कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी आयुक्तांनी दिले.आयुक्तांच्या पाहणी  दौयादरम्यानमुख्य  अभियंता श्रीराजीव गायकवाड,  सहायक आयुक्त श्रीघनश्याम पंधरेकार्यकारी अभियंता श्रीअजय गेडामसार्वजनिक आरोग्य अभियंता श्रीसंदीप लोखंडे आदी उपस्थित होतेमनपा आयुक्तांनी संपूर्ण प्रकल्पासंदर्भात माहिती जाणून घेतलीकेंद्र शासनाच्या अमृत . योजनेंतर्गत नाईक तलाव पुनरुज्जी
वन प्रकल्पाचे कार्य सुरू असल्याची माहिती विभागाद्वारे देण्यात आलीसद्यस्थितीत तलावाची किनार भिंत तयार करण्यात आली असून गाळ काढण्याचे काम मुख्यत्वाने सुरू असल्याबाबत कार्यकारी अभियंता श्रीसंदीप लोखंडे यांनी सांगितलेपावसाळ्यात परिसरातील नागरिकांना त्रास होउ नये यादृष्टीने पावसाळ्यापूर्वी आवश्यक कामे पूर्णत्वास नेण्याबाबत आयुक्तांनी निर्देशित केले.आयुक्तांच्या पाहणी दौयादरम्यान माजी उपमहापौर श्रीदीपराज पार्डीकर आणि माजी नगरसेवक श्रीरमेश पुणेकर उपस्थित होतेत्यांनी स्थानिक अडचणींची माहिती देउन त्याबद्दल योग्य कार्यवाही करण्याची मागणी यावेळी केली

पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्यास होणारी अडचण लक्षात घेता यादृष्टीने कामे करण्याबाबत त्यांनी मागणी केलीयावेळी आयुक्तांनी नाईक तलावाजवळून वाहणा-या नाल्याची  देखील पाहणी  केलीतातडीने  नाल्याची संपूर्ण स्वच्छता करण्याचे त्यांनी निर्देश दिले.यावेळी सतरंजीपुरा झोनचे कनिष्ठ अभियंता श्रीराजीव राजुरकरनाईक तलाव पुनरुज्जीवन प्रकल्पाचे कंत्राटदार श्रीविनय पाटीलसल्लागार श्रीनिशिकांत भिवगडे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

अंबाझरी, फुटाळा व गोरेवाडा तलावांवर सुरक्षेच्या उपाययोजना नागरिकांनी सुरक्षेच्या सूचनांचे पालन करावे

नागपूर - शहरातील अंबाझरी ,  फुटाळा व गोरेवाडा तलाव ओव्हर फ्लो होण्याची शक्यता लक्षात    घेऊन नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने तसेच...