Saturday, June 8, 2024

३० जून पूर्वी ऑनलाईनरित्या मालमत्ता कर भरल्यास १५ टक्के सूट

नागपूर : नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील मालमत्ता धारकांसाठी मनपाद्वारे महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहेआर्थिक वर्ष २०२४,२५ मध्ये मालमत्ता कराची चालू वर्षाची पूर्ण रक्कम एकमुस्त ऑनलाईन माध्यमातून नागपूर महानगरपालिका निधीत जमा करणाऱ्या मालमत्ता धारकास कर रक्कमेत १५ टक्के सूट दिली जाणार आहेयाशिवाय ऑफलाईन माध्यमातून कर भरणाऱ्या मालमत्ता धारकास १० टक्के सूट देण्यात येणार आहे.नागपूर महानगरपालिकेच्या या योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा  ऑनलाईन पेमेंट सुविधेचा देखील वापर जास्तीत जास्त नागरिकांनी करावाअसे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉअभिजीत चौधरी यांनी केले आहे
दर योजनेबाबत माहिती देताना उपायुक्त (महसूलश्री.मिलींद मेश्राम यांनी काही बाबी स्पष्ट केल्या आहेतत्यानुसार३० जून २०२३ पूर्वी चालू आर्थिक वर्षाची मालमत्ता कर रक्कम ऑनलाईन पेमेंट पद्धतीने नागपूर महानगरपालिका निधीत जमा केल्यास एकूण १५ टक्के सूट दिली जाणार आहेतर ऑफलाईन पद्धतीने केल्या १० टक्के सूट दिली जाणार आहे एप्रिलपासून ही योजना सुरू झालेली असून योजनेद्वारे आतापर्यंत 30.74 कोटी रुपये कर भरणा करण्यात आलेला आहेयामध्ये लक्ष्मीनगर झोन आघाडीवर असून झोनमधील मालमत्ता धारकांनी योजनेचा लाभ घेत . कोटी रुपये मनपा निधीत जमा केलेयापोठोपठ हनुमान नगर झोनमधून 4.09 कोटी रुपयेमंगळवारी झोनमधून 4.13 कोटी रुपयेनेहरूनगर झोनमधून .56 कोटी रुपयेधरमपेठ झोनमधून 3.10 कोटी रुपयेआशीनगर झोनमधून .92 कोटी रुपयेलकडगंज झोनमधून .72 कोटी रुपये,
धंतोली झोनमधून 2.51 कोटी रुपयेगांधीबाग झोनमधून १.21 कोटी तर सर्वात कमी सतरंजीपुरा झोनमधून 94 लक्ष रुपये मालमत्ता कर जमा झालेला आहे.या योजनेद्वारे मागील वर्षात दहाही झोनमधून 30 जुन 2023 पर्यंत 42.66  कोटी रुपये  मालमत्ता कर  मनपा निधीत  जमा करण्यात आलेला होता. २०२४,२५ या चालू आर्थिक वर्षातही जास्तीत जास्त मालमत्ता कर धारकांनी या योजनेचा लाभ घ्यावा  ऑनलाईन सुविधेचा वापर करून मनपा निधीत मालमत्ता कर रक्कम जमा करावीअसे आवाहन उपायुक्त (महसूलश्रीमिलींद मेश्राम यांनी केले आहे.आजपर्यंत ऑनलाईन सुविधेचा वापर करुन 25,317 नागरिकांनी या योजने अंतर्गत मनपा निधीत मालमत्ता कर जमा करुन रु 1.56 कोटीचा लाभ घेतला व ऑफ लाईन सुविधेचा वापर करुन 48,846 नागरिकांनी ह्या योजने अंतर्गत मनपा निधीत मालमत्ता कर जमा करुन रु. 1.26 कोटीचा लाभ घेतला. 

No comments:

Post a Comment

पंतप्रधान आर्य चाणक्य कौशल्य विकास योजना आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्ट अप योजनेचा करणार आरंभ

नवी दिल्ली:- पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील वर्ध्याला भेट देणार आहेत. सकाळी साडेअकराच्या सुमारास ते पीएम विश्वकर्मा ...