Saturday, June 8, 2024

सर्व श्वान मालकांना मनपात श्वान नोंदणी बंधनकारक

नागपूरनागपूर महानगरपालिकेने पाळीव श्वानांच्या नोंदणी प्रक्रियेला सुरूवात केली आहेमनपा हद्दीतील श्वान पाळण्याकरीता नागपूर महानगरपालिकेत नोंदणी करणे सर्व श्वान मालकांना बंधनकारक करण्यात आले आहेदहाही झोनमध्ये नोंदणीची व्यवस्था करण्यात आली असूनश्वान मालकांसाठी मनपाने केलेल्या व्यवस्थेचा लाभ घ्यावाअसे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉअभिजीत चौधरी यांनी केले आहेभारतीय प्रजातिच्या श्वानांची नोंदणीसाठी कमी शुल्क ठेवण्यात आला 
आहे.मनपा हद्दीतील सर्व श्वान मालकांनी त्यांच्या पाळीव श्वानांची नोंदणी तीन महीन्याच्या अर्थात ९० दिवसाच्या आत करून घेणे बंधनकारक केले आहेमनपाच्या दहाही झोन कार्यालयांमध्ये श्वान नोंदणीची व्यवस्था करण्यात आलेली आहेनोंदणीबाबत आवश्यक सुचनापरिपत्रक महानगरपालिकेचे संकेतस्थळ www.nmcnagpur.gov.in/circularfordogregistration या लिंकवर नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेविना नोदंणी करता श्वान मालकाद्वारे श्वान पाळल्याचे निदर्शनास आल्यास किंवा तशी तक्रार प्राप्त झाल्यास संबधित श्वान मालका विरुद्ध नियमान्वये कार्यवाही करण्यात येणार असल्याचे उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉगजेंद्र महल्ले यांनी सांगितले.नागरिकांनी श्वानांची नोंदणी खालील अटी-शर्तींच्या आधीन राहून करून घ्यायची आहे.- मनपा हद्दीतील सर्व श्वान मालकांनी त्यांचे पाळीव  श्वानाची नोंदणी  मनपात  करून घेणे बंधनकराक आहे.- श्वान नोंदणी करीता रू५०० प्रतिवर्ष प्रति श्वान नोंदणी शुल्क आकारण्यात येईल.  एक कुटुंब  जास्तीत जास्त तीन श्वानाची नोंदणी करू शकतीलतीन पेक्षा अधिक श्वान पाळणाऱ्या कुटुंबास विशेष परवाना घेणे आवश्यक आहे.श्वानाच्या नोंदणीकरीता तसेच विशेष परवाना मिळविण्याणकरीता आवश्यक कागदपत्रे सोबत जोडलेल्या परिशिष्ट ''नुसार सादर करणे आवश्यक राहील.नोंदणी करताना श्वानाला Anti Rabies चे लसीकरण केलेले असणे  त्याबाबतचे  पंजिकृत  
पशुवैद्यकाचे सही शिक्कासह प्रमाणपत्र किंवा लसीकरण बाबतचा रेकॉर्ड सादर करणे आवश्यक आहे.- भारतीय प्रजातीच्या  श्वान पाळण्याकरिता प्रोत्साहन मिळावेयाकरिता भारतीय श्वान पाळणाऱ्या कुटूंबास नोंदणी शुल्क केवळ रू२००  वर्ष प्रतिश्वान आकारण्यात येईल.भारतीयप्रजातिच्या श्वान पाळणाऱ्या कुटूंबाने त्या श्वानांची नसबंदी शस्त्रक्रिया केलेली असल्यास नोंदणी शुल्क पूर्णतः माफ करण्यात येईल.भारतीय प्रजातिच्याश्वान व्यतिरिक्त इतर प्रजातीच्या श्वानांची नसबंदी शस्त्रक्रिया केलेली असल्यासअशा श्वान मालकास नोंदणी शुल्क केवळ रू२००  प्रतिवर्ष प्रतिश्वान आकारण्यात येईलश्वानाची नसबंदी केलेल्या मालकास नसबंदी शस्त्रक्रिया करून घेण्यात आलेल्या पशुवैद्यक यांचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहेश्वान मालकाने नसबंदी
 शस्त्रक्रियालसीकरण बाबतचे प्रमाणपत्र फर्जीचुकीचे प्रमाणपत्र आढळून आल्यास श्वान मालकावर रू२०,००० पर्यंतचा दंड आकारण्यात येईलतसेच नसबंदी शस्त्रक्रिया  करता प्रमाणपत्र दिल्याचे आढळून आल्यास संबंधित पशुवैद्यक यांचेवर रू२०,००० पर्यंत दंड आकारण्यात येईल.श्वान नोंदणी बाबत जाहीर सूचना प्रसिध्द केल्यापासून  महिन्याचे आत सर्व श्वान मालकांनी नोंदणी करून घेणे आवश्यक राहीलया मुदतीनंतर नोंदणी करणाऱ्या श्वान मालकास प्रतिदिवस रू दंड आकारण्यात येईलश्वान नोंदणीचे प्रमाणपत्र हे  एप्रिल ते ३१ मार्च या आर्थिक वर्षाकरिता लागू राहील.प्रत्येक वर्षाच्या  ते ३० एप्रिल या कालावधी मध्ये नोंदणी करणे आवश्यक राहीलत्या नंतर नोंदणी करणाऱ्या श्वान मालकास रू  प्रति दिवस प्रमाणे दंड आकारण्यात येईल
विना परवाना किंवा नोंदणी  करता श्वान पाळताना आढळून आल्यास किंवा तक्रार प्राप्त झाल्यास प्रथम नोटीस बजावून नोंदणी करण्याची सुचना देण्यात येईल.ठराविक मुदतीत दंडा सह नोंदणी करून घेणे आवश्यक राहीलतसे  झाल्यास संबंधित श्वान मालकास रू,००० प्रशासकीय दंड आकारण्यात येईलआकारण्यात येणारा दंड सर्व प्रकारच्या श्वाना करीता लागु राहील.श्वान ओळख म्हणून मायक्रोचीप बसविणे योग्य राहिल.श्वानाला बाहेर नेताना साखळी  (Muzzle) म्यु.झेल असणे आवश्यक आहेबाहेर फिरवताना श्वानाने कुठेही विष्ठा टाकू नयेयाकरिता सोबत पॉप स्टी (Poop stick) चा वापर करणे आवश्यक आहे.

No comments:

Post a Comment

पंतप्रधान आर्य चाणक्य कौशल्य विकास योजना आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्ट अप योजनेचा करणार आरंभ

नवी दिल्ली:- पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील वर्ध्याला भेट देणार आहेत. सकाळी साडेअकराच्या सुमारास ते पीएम विश्वकर्मा ...