Thursday, June 20, 2024

मनपातर्फे सर्वोत्कृष्ट आशा स्वयंसेविकांना पुरस्कार प्रदान

नागपूर:- आशा स्वयंसेविका या “आशाताई” म्हणून घराघरातील कुटुंबाचा भाग झाल्या आहेतनागरिकशासन-प्रशासन स्तरावरही आशा  स्वयंसेविकांना “आशाताई” म्हणूनच संबोधले जातेनागरिकांचा विश्वास त्यांच्यावर आहेयाच विश्वासाच्या जोरावर “आशाताई” आज आपल्या आरोग्य यंत्रणेचा महत्त्वाचा कणा बनल्या आहेतअसे प्रतिपादन नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉअभिजीत चौधरी यांनी केले. मनपा आयुक्त गुरुवारी (ता २०रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत नागपूर महानगरपालिका आरोग्य विभागाच्यावतीने आयोजित सर्वोत्कृष्ट आशा स्वयंसेविका पुरस्कार सोहळ्यात मार्गदर्शनपर बोलत होते.
 मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉअभिजीत चौधरी अध्यक्षस्थानी असलेल्या कार्यक्रमात आरोग्य उपसंचालक डॉकांचन वानेरेमनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉदीपक सेलोकरहनुमाननगर झोनचे सहायक आयुक्त श्रीनरेंद्र बावनकरमनपाचे अतिरिक्त आरोग्य 
अधिकारी द्वय डॉनरेंद्र बहिरवारडॉविजय जोशीप्रजनन  बालकल्याण अधिकारी डॉसरला लाडहत्तीरोग अधिकारी डॉमंजुषा मठपतीशहर क्षयरोग अधिकारीडॉशिल्पा जिचकारसाथरोग अधिकारी गोवर्धन नवखरेझोनल वैद्यकीय अधिकारी डॉअतिक खान यांच्यासह मनपाचे अधिकारी कर्मचारी  शेकडोंच्या संख्येत आशा स्वयं सेविका उपस्थित होत्याकार्यक्रमात  मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉअभिजीत चौधरी यांच्या हस्ते मनपा कार्यक्षत्रातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कार्यरत आशा स्वयंसेविका यांचा पुरस्कारप्रमाणपत्र  धनादेश देऊन सत्कार करण्यात आलामनपा शहरी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आशीनगर झोन अंतर्गत कपिल नगर युपीएचसी येथील श्रीमती यजुकला संजय गजभिये यांना प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आलात्यांचा मान्यवरांच्या हस्ते २५ हजार रुपयांचा धनादेशप्रमाणपत्र  सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
तर द्वितीय पुरस्कार धंतोली झोन अंतर्गत येणाऱ्या बाबुलखेडा युपीएचसी येथील संगीता नितीन वानखेडे यांना प्रदान करण्यात आलासंगीता वानखेडे यांचा मान्यवरांच्या हस्ते १५ हजार रुपयांचा धनादेशप्रमाणपत्र  सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आलातृतीय पुरस्कार धरमपेठ झोन अंतर्गत येणाऱ्या फुटाळा युपीएचसी येथील सारिका दिनेश झाडे यांना प्रदान करण्यात आलासारिका  झाले यांना मान्यवरांच्या हस्ते  हजार रुपयांचा धनादेशप्रमाणपत्र  सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉअभिजीत चौधरी म्हणाले कीचांगले काम करणाऱ्यांना प्रोत्साहित करायला हवेयामुळे इतरांना उत्तम कार्य करण्याची प्रेरणा मिळते





युपीएससी स्तरावर अशाच प्रकारचे पुरस्कार देण्याचा मानस मनपाचा असल्याचेही डॉचौधरी म्हणालेयाशिवाय सध्याचे जग हे तंत्रज्ञानचे असूनआशाताईंनी देखील स्वतःला अपडेट करून तंत्रस्नेही व्हायला हवेपुढेचालून आरोग्य यंत्रणेचे संपूर्ण काम हे ऑनलाईन होणार असल्याचेही डॉचौधरी यावेळी म्हणाले.तर उपसंचालक डॉकांचन वानेरे यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांना मिळावा याकरिता आशा स्वयंसेविकांनी योजनांच्या जनजागृतीत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा असे आवाहन केलेकार्यक्रमाचे प्रास्ताविक करीत डॉदीपक सेलोकर यांनी  आशा स्वयंसेविकांनी माता  अर्भक मृत्यू दर काम करण्यासाठी जनजागृती करावी असे आवाहन केलेयाशिवाय मनपातर्फे लवकरच आशा सेविकांना टँबलेटचे
 वितरण करण्यात येणार असल्याचे ही डॉसेलोकर यांनी सांगितलेकार्यक्रमात सर्वप्रथम डॉसरला लाड यांनी आपल्या संगणकीय सादारीकरणाद्वारे  “आशांचे काम आणि मोबदला” याबाबत माहिती दिलीतर डॉअतिक खान यांनी आभार व्यक्त केले

No comments:

Post a Comment

पंतप्रधान आर्य चाणक्य कौशल्य विकास योजना आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्ट अप योजनेचा करणार आरंभ

नवी दिल्ली:- पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील वर्ध्याला भेट देणार आहेत. सकाळी साडेअकराच्या सुमारास ते पीएम विश्वकर्मा ...