Wednesday, June 26, 2024

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 68 प्रकरणांची नोंद- उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

 नागपूर:नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवरकचरा फेकणाऱ्यांवरथुंकणाऱ्यांवर५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईची सुरुवात केली आहेबुधवारी (ता26रोजी उपद्रव शोध पथकाने 68 प्रकरणांची नोंद करून 39 हजार 800 रुपयाचा दंड वसूल केला.शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावरफुटपाथवर कचरा टाकणारेथुंकणारेघाण करणारेलघुशंका करणारेप्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु आहेसार्वजनिक ठिकाणी, रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी थुंकणे या अंतर्गत प्रकरणांची नोंद करुन हजार  200 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. हाथगाडया
स्टॉल्सपानठेले,  फेरीवालेछोटे  भाजी विक्रेते  यांनी  लगतच्या  परिसरात  अस्वच्छता (रु४००/- दंडया अंतर्गत 15 प्रकरणांची नोंद करून 6 हजार रुपयांचा दंड 
वसुल करण्यात आलाव्यक्तीने रस्ताफुटपाथ मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 3 प्रकरणांची नोंद करून 300 रुपयांचा दंडवसुल करण्यात  आलादुकानदाराने  रस्ताफुटपाथमोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 02 प्रकरणांची नोंद करून 800 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. वाहतुकीचा रस्ता मंडप कमानस्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता  बंद करणे या अंतर्गत 11  प्रकरणांची नोंद  करून 11 हजार 500 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. वैद्यकीय व्यवसायिकांनी बॉयोमेडीकल वेस्ट सर्वसाधारण कचऱ्यात टाकणे या अंतर्गत 01 प्रकरणांची नोंद करुन 10 हजार रुपयाचा दंड वसुल करण्यात आला. वर्कशॉप, गॅरजेस व इतर दुरुस्तीचे व्यवसायीकांने रस्ता, फुटपाथ मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 02 प्रकरणांची नोंद करुन हजार रुपयाचा दंड वसुल करण्यात आला. उपरोक्त यादीत आढळणारे  इतर उपद्रव (व्यक्तीअसल्यास 25 प्रकरणांची नोंद करून 


हजार रुपये दंड  वसूल  करण्यात आलेला आहे.  उपरोक्त यादीत  आढळणारे इतर उपद्रव (संस्था) असल्यास 3 प्रकरणांची नोंद करून  3 हजार  रुपये दंड  वसूल करण्यात आला.*प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवी बाळगणाऱ्या 02 प्रकरणांची नोंद*मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे बुधवारी (ता26रोजी प्रतिबंधित प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या गांधीबाग झोन अंतर्गत धुंमबारे इन्टरप्राईजेस भालदारपुरा टी.ए. रोड आणि सतरंजीपुरा झोन अंतर्गत श्याम स्वीट्स राम सुमेर बाबा नगर या दोन प्रतिष्ठानांकडून एकुण 10 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. याशिवाय लक्ष्मीनगर झोन अंतर्गत मल्टीकेअर हॉस्पिटल कांग्रेस नगर व इस्टीलीया अपार्टमेंट शंकर नगर, धंतोली झोन अंतर्गत गेलेक्सी असोसिएट्स चंद्र नगर आणि मंगळवारी झोन अंतर्गत कासिफ क्लिनिक मानकापूर रिंग रोड रस्त्यालगत बांधकामाचा कचरा टाकण्याबाबत या चार प्रतिष्ठानांकडून एकुण 40 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. 

धरमपेठ झोन अंतर्गत कमल पोलिक्लिनिक वायुसेना नगर हजारीपहाड सामान्य कचरऱ्यासोबत आढळलेल्या वैद्यकीय कचराऱ्याची अवज्ञा करणेबाबत यांच्याकडुन 10 हजार रुपयाचा दंड वसुल करण्यात आला. हनुमान नगर झोन अंतर्गत डॉ वसंत कारटकर रेशिमबाग चौक रस्त्यालगत कचरा टाकणेबाबत यांच्याकडून 5 हजार रुपयाचा दंड वसुल करण्यात आला. नेहरुनगर झोन अंतर्गत कामधेनु एग्रो मशीनेरी संघर्ष नगर चौक रस्त्याच्या कडेला दुकानातील कचरा जाळणे बाबत याच्याकडून 5 हजार रुपयाचा दंड वसुल करण्यात आला. असे एकूण 09 प्रकरणांची नोंद करून 70 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. 
 

No comments:

Post a Comment

पंतप्रधान आर्य चाणक्य कौशल्य विकास योजना आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्ट अप योजनेचा करणार आरंभ

नवी दिल्ली:- पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील वर्ध्याला भेट देणार आहेत. सकाळी साडेअकराच्या सुमारास ते पीएम विश्वकर्मा ...