Saturday, June 29, 2024

शिवसेना महिला सेनेच्या वतीने मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे स्वागत शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ मनीषा पापडकर

[शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ मनीषा पापडकर]
नागपूर:- महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, पक्षनेते यांच्या आदेशानुसार शिवसेना प्रवक्त्या ,पक्ष सचिव आमदार डॉक्टर मनिषा ताई कायंदे,विदर्भ संघटक किरण भाऊ पांडव यांच्या मार्गदर्शनात जिल्हाप्रमुख सौ मनीषा पापडकर यांच्या नेतृत्वात महायुती सरकारने विधी मंडळात आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण ही महिला विकास योजना जाहीर केली या योजनेचे शिवसेना नागपूर महिला सेनेने जोरदार स्वागत केले.  मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत २१ ते ६० वयोगटातील महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जाणार आहेत.या योजनेच्या घोषणेमुळे महिला वर्गात आनंदाचे वातावरण आहे.या पूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सरकारने महिला सक्षमीकरणासाठी अनेक निर्णय घेतले होते.एस. टी प्रवासात महिलांना सरसकट ५०% सवलत लागू करण्यात आली होती. आज  मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहीर झाली आहे या योजनेसाठी ४६००० कोटींची तरतूद 
केली आहे. याशिवाय पदवीपर्यंत मुलींना मोफत शिक्षण, महिला ई रिक्षासाठी अर्थसहाय्य, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने अंतर्गत पात्र कुटुंबाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहेत, यासारखे मोठे निर्णय सरकारने घेतले आहेत. याचा थेट फायदा राज्यातील लाखो महिलांना होणार आहे.सरकारच्या या निर्णयाचे शिवसेना महिला सेनेच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले. सरकार महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील आहे. आजचा निर्णय समस्त महिला वर्गासाठी महत्वाचा असल्याची भावना शिवसेना जिल्हाप्रमुख सौ मनीषा पापडकर यांनी व्यक्त केल्या .या निर्णयाचा जल्लोष करण्यासाठी शिवसेना मध्यवर्ती कार्यालय धंतोली नागपूर येथे  महिला पदाधिकारी यांनी फुगड्या खेळून मिठाई वाटप करून जल्लोष साजरा करण्यात आला   या कार्यक्रमाला    मनीषाताई पापडकर, अनिताताई जाधव , गायत्री वैद्य ,मीनाताई जालेकर , मनीषा पराड , मंजुषा पानबुडे ,पुनम चाडगेमाया मेश्राम कलावती दरोडे, मंदा कुकडे ,शीला तीतरमारे ,मोना शेंडे ,शितल आडके, वंदना निपाने ,लक्ष्मी बिंडे, लता बर्डे. सर्व महिला विभाग प्रमुख, महिला नेत्या, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी  फटाके फोडून जल्लोष करण्यात आला.

No comments:

Post a Comment

पंतप्रधान आर्य चाणक्य कौशल्य विकास योजना आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्ट अप योजनेचा करणार आरंभ

नवी दिल्ली:- पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील वर्ध्याला भेट देणार आहेत. सकाळी साडेअकराच्या सुमारास ते पीएम विश्वकर्मा ...