Monday, June 3, 2024

आयुक्तांनी केली श्रद्धानंद पेठ ते एलएडी चौक रस्त्याच्या कामाची पाहणी

नागपूरनागपूर महानगरपालिकेतर्फे श्रद्धानंदपेठ ते एलएडी चौक दरम्यानच्या जवळपास ९०० मीटर मार्गाचा विकास केला जात आहेयाच विकास कामाची मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.अभिजीत चौधरी यांनी सोमवारी (ता.पाहणी केली.आयुक्त तथा प्रशासक डॉ.अभिजीत चौधरी यांनी पाहणीची सुरुवात अभ्यंकर नगर चौकापासून केलीएलएडी चौक ते अभ्यंकर नगर चौक दरम्यान अमृत- अंतर्गत  पूर्ण झालेल्या पाईप  लाईनच्या कामाची  तसेच त्याच लांबीमध्ये सुरू करावयाच्या सीमेंट रोडच्या कामाची  पाहणी  केलीसदर  लांबीमध्ये रस्त्याच्या ज्या बाजूला पाईप लाईन टाकण्यात आली आहे त्या भागातील रस्त्याची पुनर्स्थापना योग्यरित्या केली नसल्याने दुचाकी वाहनांचे अपघात होत असल्याचे मा. आयुक्त निदर्शनास आले होतेकंत्राटदारामार्फत रस्त्याची  पुनर्स्थापना योग्यरित्या  केली गेली  नसल्याने आयुक्तांनी नाराजी व्यक्त केलीतातडीने नियोजन करून लवकरात लवकर रस्त्याची पुनर्स्थापना करण्याचे सक्त निर्देशही या
वेळी दिलेयाशिवाय रस्त्याच्या कामाला सुरुवात करताना त्या ठिकाणी सूचना फलक  काम सुरू केल्याची/काम पूर्ण होण्याची दिनांक नमूद करावेकंत्राटदाराने स्वतःचा पत्ता  संपर्कासाठी मोबाईल क्रमांक असलेला बोर्ड लावावातसेच रस्त्याचे काम सुरू केल्यास रस्त्याच्या दोन्ही टोकावर योग्यरीत्या बॅरीकेट्स लावावेआपले वाहतूक सुरक्षा रक्षक किंवा स्वयंसेवक नेमावेअसेही निर्देश आयुक्त तथा प्रशासक डॉअभिजीत चौधरी यांनी दिले.याप्रसंगी मनपाचे मुख्य अभियंता श्रीराजीव गायकवाडअधीक्षक अभियंता श्रीमनोज तालेवारश्रीमती लीना उपाध्यायडॉश्वेता बॅनर्जीकार्यकारी अभियंता विजय गुरुबाक्षानी प्रामुख्याने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

अंबाझरी, फुटाळा व गोरेवाडा तलावांवर सुरक्षेच्या उपाययोजना नागरिकांनी सुरक्षेच्या सूचनांचे पालन करावे

नागपूर - शहरातील अंबाझरी ,  फुटाळा व गोरेवाडा तलाव ओव्हर फ्लो होण्याची शक्यता लक्षात    घेऊन नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने तसेच...